तंबाखू पडली महागात, लॉक डाऊनमध्ये पोलिसांनी दिले नको तिथे फटके 

लॉकडाऊनला न जुमानता लोक रस्त्यावर येत होते. यात एक तरूण तंबाखूचं व्यसन असल्यामुळे बाहेर पडला. पण त्याला हे बाहेर पडणे खूप महागात पडले. 

lockdown coronavirus tobacco police stick action again young boy
तंबाखू पडली महागात, लॉक डाऊनमध्ये पोलिसांनी दिले नको तिथे फटके  

पुणे :   देशात सर्वत्र काल जनता कर्फ्यूचे पालन करण्यात आले. त्यानंतर आज राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या शहरात लॉक डाऊन जाहीर केले. पण या लॉकडाऊनला न जुमानता लोक रस्त्यावर येत होते. यात एक तरूण तंबाखूचं व्यसन असल्यामुळे बाहेर पडला. पण त्याला हे बाहेर पडणे खूप महागात पडले. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात पोलीस तरूणाला कशासाठी बाहेर पडला हे विचार आहेत. तर त्यावर तो म्हणतो मला तंबाखूचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पोलीस त्याला तंबाखू देण्यास सांगतात. तो खिशातून तंबाखू काढतो. पण त्यानंतर  एक ट्रॅफीक पोलीस त्याला पाठीत एक चांगला धपाटा देतात. 


त्यानंतर हा तरूण आपली तंबाखूची पुडी काढतो. त्यानंतर एक हवालदार त्याला नको त्या ठिकाणी एक नाही दोनदा काठीने बडवतो. त्यावेळी या तरूणाचा आवाज हा पाहून व्हिडिओ पाहणाऱ्यांना हसू फुटत आहे. 

पाहा हा व्हायरल व्हिडिओ. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...