लव... किडनी... और धोका, तरुणीवर आली पश्ताप करण्याची वेळ, सनम बेवफाची वाचा बेवफाई

प्रेमासाठी मनुष्य जीव द्यायला मागेपुढे पाहत नाही. पण ज्यांच्यासाठी आपण जीव देणार तोच जर बेवफा निघाला तर. मला वाटतं प्रेम असेल तेथे फसवणूक होणार हे जणू नेहमीचं झालं आहे. असाच एक किस्सा एका मुलीसोबत घडला आहे. प्रियकराचा जीव वाचविण्यासाठी तिने त्याला किडनी दिली. त्यानंतर जीव वाचल्यानंतर त्या प्रियकराने प्रेयसीशी नातं तोडलं. कोलीन ली असे या मुलीचे नाव आहे.

Boyfriend Cheated Girlfriend
प्रेमासाठी प्रेयसीनं दिली किडनी, जीव येताचं त्याने साथ सोडली  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • किडनी देऊन प्रियकराचा जीव वाचवला
  • प्रियकराला दुसरे जीवन दिले.
  • मुलगी तिच्या प्रियकरासोबत रिलेशनशिपमध्ये आली तेव्हा त्याला किडनीचा आजार झाला होता.

Boyfriend Cheated Girlfriend : प्रेमासाठी मनुष्य जीव द्यायला मागेपुढे पाहत नाही. पण ज्यांच्यासाठी आपण जीव देणार तोच जर बेवफा निघाला तर. मला वाटतं प्रेम असेल तेथे फसवणूक होणार हे जणू नेहमीचं झालं आहे. असाच एक किस्सा एका मुलीसोबत घडला आहे. प्रियकराचा जीव वाचविण्यासाठी तिने त्याला किडनी दिली. त्यानंतर जीव वाचल्यानंतर त्या प्रियकराने प्रेयसीशी नातं तोडलं. कोलीन ली असे या मुलीचे नाव आहे.

जेव्हा ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत रिलेशनशिपमध्ये आली तेव्हा त्याला किडनीचा आजार झाला होता. तिचा प्रियकर तिच्यापेक्षा लहान होता आणि वयाच्या 17 व्या वर्षी त्याला किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. गर्लफ्रेंड इतक्या कमी दिवसात त्याच्या प्रेमात इतकी गुंतली होती की तिने त्याला तिची किडनी देण्याचा निर्णय घेतला. मात्र किडनी मिळताच प्रियकराने रंग दाखवत बेवफा बनला. त्या मुलीची फसवणूक करत नात्यातून पळ काढला. 

विश्वासघातकी प्रियकर 

कॉलीनने सांगितले की, जेव्हा तिने तिच्या प्रियकराला किडनी दान केली तेव्हा तिची अवस्था मेल्यासारखी झाली होती. एका टॉक शोमध्ये बोलत असताना प्रेयसीने सांगितले की, तिचा प्रियकर खूप गंभीर आजाराने त्रस्त होता. जर तिने त्याला किडनी दिली नसती तर कदाचित तो मेला असता. परंतु आधी तिची किडनी तिच्या प्रियकरासाठी योग्य आहे का ही चाचणी करणं आवश्यक होतं. डॉक्टरांनी ती चाचणी केली. तिची चाचणी झाली आणि जेव्हा तिला खात्री झाली की ती आपली किडनी देऊ शकते. त्यानंतर तिने कोणताही विचार न करता तिची किडनी प्रियकराला दिली. यावेळेस त्यांचे नाते फक्त 6 महिन्यांचे होते.

Read Also : बलात्काराचा आरोप करत तरुणीने तरुणाकडून उकाळले 5 लाख रुपये

दरम्यान, किडनी मिळाल्यानंतर, प्रियकर पूर्ण बरा झाला आणि सात महिन्यांनंतर तो लास वेगासला बॅचलर ट्रिपला गेला. परत आल्यावर त्याने सांगितले की, तिथे दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याचे प्रेयसीने सांगितले. ही बाब समोर आल्यानंतरही प्रेयसीने त्याला आणखी एक संधी दिली. मात्र, तीन महिन्यांनंतर प्रियकराने तिच्याशी संबंध तोडले आणि तिला सर्व सोशल मीडियावर ब्लॉक करत पळून गेला. सोशल मीडियावर शेअर करत कॉलीनने लिहिले की, 'माझ्या बॉयफ्रेंडला किडनी देताना मला खूप आनंद होत आहे, कारण त्याला दुसरे आयुष्य मिळाले आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी