आत्तापर्यंत आपण मांजरी (Cat) आणि कोंबड्याला (cock) एकमेकांचे शत्रू (enemies) म्हणून पाहिले असेल. एकमेकांशी भांडताना आणि घाबरताना पाहिले असेल, पण आज आम्ही आपल्याला असा एक व्हिडिओ (video) दाखवणार आहोत जो पाहून आपण चकित व्हाल. सोशल मीडियावर (social media) एक कोंबडा आणि मांजरीची ही दोस्ती (friendship) व्हायरल (viral) होत आहे. यात एक कोंबडा भुकेलेल्या मांजरीला खाणे खाण्यात मदत करताना दिसत आहे. यात आपण पाहू शकता की इथे तीन मांजरे आहेत ज्यापैकी दोन आजूबाजूला आहेत आणि एक कोंबड्याच्या पाठीवर चढून खाणे खात आहे.
या व्हिडिओत साफ दिसत आहे की ही जाडजूड मांजरी या कोंबड्याच्या पाठीवर चढली आहे आणि खाणे खात आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ आयएफएस सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की वाईट काळात भांडण्याऐवजी एकत्र येऊन त्याचा सामना करायला हवा.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. यूजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आत्तापर्यंत त्याला 10 हजारापेक्षाही जास्त व्ह्यूज, एक हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. एकमेकांचे कट्टर वैरी असणारे हे दोन प्राणी इतके चांगले मित्र बनू शकतात यावर लोकांचा विश्वासच बसत नाही आहे.