१०७ हुतात्मे आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना, पण...

महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. ही चळवळ जोरात सुरू असतानाच एक घटना घडली. या घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 

Maharashtra Day History
महाराष्ट्र दिन 

थोडं पण कामाचं

  • १०७ हुतात्मे आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना, पण...
  • मराठी बहुल बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग कर्नाटकमध्ये
  • संयुक्त महाराष्ट्र चळवळ

मुंबईः भारत सरकारने भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अनुसरुन मराठी बहुल नागरिकांसाठी महाराष्ट्र या राज्याची स्थापना करण्याची मागणी पुढे आली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा या मागणीला विरोध होता. राज्यकर्त्यांचा हा विरोध पाहून नागरिक संतापले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. ही चळवळ आक्रमक झाली आणि अखेर नागरिकांची मागणी मान्य झाली. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी दिली. पण आजही मराठी बहुल बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग कर्नाटकमध्ये आहे. तो महाराष्ट्राला जोडलेला नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मूळ मागणी पूर्ण झाली नाही. अखंड महाराष्ट्राचे स्वप्न अपूर्ण राहिले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. ही चळवळ जोरात सुरू असतानाच एक घटना घडली. या घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 

राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. हा निर्णय कळल्यापासून मुंबईकर नाराज होते. मुंबईतील मराठी समाजमन संतापले होते. फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. गर्दी वाढू लागली. कामगार आणि पांढरपेशांचा (व्हाइट कॉलर) मोर्चा निघाला. सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू झाली. फोर्ट परिसरातील जमावबंदी आणि सभाबंदी मोडून नागरिकांनी बंड पुकारले. अनेकांनी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात रस्त्यावर बसून सत्याग्रह सुरू केला. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. लाठीमार झाला तरी गर्दी हटत नाही हे बघून पोलिसांनी गोळीबार केला. मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिसताक्षणी गोळ्या घाला असा आदेश दिला. या आदेशाचे विपरित परिणाम झाले. गोळीबारात १०७ जण हुतात्मा झाले. 

अवघ्या काही मिनिटांत वातावरण बदलले. या घटनेचा परिणाम झाला आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी मिळाली. हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या फ्लोरा फाउंटन येथे राज्याच्या स्थापनेनंतर हुतात्मा चौक बांधण्यात आला आणि त्यावर सर्व हुतात्म्यांची नावं कोरण्यात आली. हुतात्मा स्मारकाची स्थापना १९६५ मध्ये झाली. याआधी १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यामुळेच १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. ज्या १०७ जणांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या हुतात्म्यांना नागरिक आजही नमन करतात. दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेकजण हुतात्मा स्मारकाला भेट देतात आणि हुतात्म्यांना वंदन करतात.

मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणारे १०७ हुतात्मे

१) सिताराम बनाजी पवार
२) जोसेफ डेव्हिड पेजारकर
३) चिमणलाल डी. शेठ
४) भास्कर नारायण कामतेकर
५) रामचंद्र सेवाराम
६) शंकर खोटे
७) धर्माजी गंगाराम नागवेकर
८) रामचंद्र लक्ष्मण जाधव
९) के. जे. झेवियर
१०) पी. एस. जॉन
११) शरद जी. वाणी
१२) वेदीसिंग
१३) रामचंद्र भाटीया
१४) गंगाराम गुणाजी
१५) गजानन ऊर्फ बंडू गोखले
१६) निवृत्ती विठोबा मोरे
१७) आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
१८) बालप्पा मुतण्णा कामाठी
१९) धोंडू लक्ष्मण पारडूले
२०) भाऊ सखाराम कदम
२१) यशवंत बाबाजी भगत
२२) गोविंद बाबूराव जोगल
२३) पांडूरंग धोंडू धाडवे
२४) गोपाळ चिमाजी कोरडे
२५) पांडूरंग बाबाजी जाधव
२६) बाबू हरी दाते
२७) अनुप माहावीर
२८) विनायक पांचाळ
२९) सिताराम गणपत म्हादे
३०) सुभाष भिवा बोरकर
३१) गणपत रामा तानकर
३२) सिताराम गयादीन
३३) गोरखनाथ रावजी जगताप
३४) महमद अली
३५) तुळशीराम पुंजाजी बेलसरे
३६) देवाजी सखाराम पाटील
३७) शामलाल जेठानंद
३८) सदाशिव महादेव भोसले
३९) भिकाजी पांडूरंग रंगाटे
४०) वासुदेव सुर्याजी मांजरेकर
४१) भिकाजी बाबू बांबरकर
४२) सखाराम श्रीपत ढमाले
४३) नरेंद्र नारायण प्रधान
४४) शंकर गोपाल कुष्टे
४५) दत्ताराम कृष्णा सावंत
४६) बबन बापू भरगुडे
४७) विष्णू सखाराम बने
४८) सिताराम धोंडू राडये
४९) तुकाराम धोंडू शिंदे
५०) विठ्ठल गंगाराम मोरे
५१) रामा लखन विंदा
५२) एडवीन आमब्रोझ साळवी
५३) बाबा महादू सावंत
५४) वसंत द्वारकानाथ कन्याळकर
५५) विठ्ठल दौलत साळुंखे
५६) रामनाथ पांडूरंग अमृते
५७) परशुराम अंबाजी देसाई
५८) घनश्याम बाबू कोलार
५९) धोंडू रामकृष्ण सुतार
६०) मुनीमजी बलदेव पांडे
६१) मारुती विठोबा म्हस्के
६२) भाऊ कोंडीबा भास्कर
६३) धोंडो राघो पुजारी
६४) हृदयसिंग दारजेसिंग
६५) पांडू माहादू अवरीरकर
६६) शंकर विठोबा राणे
६७) विजयकुमार सदाशिव भडेकर
६८) कृष्णाजी गणू शिंदे
६९) रामचंद्र विठ्ठल चौगुले
७०) धोंडू भागू जाधव
७१) रघुनाथ सखाराम बीनगुडे
७२) काशीनाथ गोविंद चिंदरकर
७३) करपैया किरमल देवेंद्र
७४) चुलाराम मुंबराज
७५) बालमोहन
७६) अनंता
७७) गंगाराम विष्णू गुरव
७८) रत्नु गोंदिवरे
७९) सय्यद कासम
८०) भिकाजी दाजी
८१) अनंत गोलतकर
८२) किसन वीरकर
८३) सुखलाल रामलाल बंसकर
८४) पांडूरंग विष्णू वाळके
८५) फुलवरी मगरु
८६) गुलाब कृष्णा खवळे
८७) बाबूराव देवदास पाटील
८८) लक्ष्मण नरहरी थोरात
८९) ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९०) गणपत रामा भुते
९१) मुनशी वझीरअली
९२) दौलतराम मथुरादास
९३) विठ्ठल नारायण चव्हाण
९४) देवजी शिवन राठोड
९५) रावजीभाई डोसाभाई पटेल
९६) होरमसजी करसेटजी
९७) गिरधर हेमचंद लोहार
९८) सत्तू खंडू वाईकर
९९) गणपत श्रीधर जोशी
१००) माधव राजाराम तुरे(बेलदार)
१०१) मारुती बेन्नाळकर
१०२) मधूकर बापू बांदेकर
१०३) लक्ष्मण गोविंद गावडे
१०४) महादेव बारीगडी
१०५) कमलाबाई मोहिते
१०६) सिताराम दुलाजी घाडीगांवकर
१०७) शंकरराव तोरस्कर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी