महाराष्ट्र दिन रांगोळी - व्हायरल व्हिडीओ

आज १ मे. महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनानिमित्त झटपट काढा आकर्षक रांगोळी

Maharashtra Din Rangoli Video
महाराष्ट्र दिन रांगोळी 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्र दिन रांगोळी - व्हायरल व्हिडीओ
  • झटपट काढा आकर्षक रांगोळी
  • सोपी आणि सुटसुटीत रांगोळी

आज १ मे. महाराष्ट्र दिन. आजच्याच दिवशी १९६० मध्ये महाराष्ट्र या राज्याची स्थापना झाली. भाषावार प्रांतरचनेंतर्गत मराठी बहुल नागरिकांचे राज्य म्हणून महाराष्ट्र या राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला. याआधी महाराष्ट्र राज्यासाठी नागरिकांना मोठे बलिदान दिले होते. या सर्व घटनांची आठवण म्हणून महाराष्ट्रात १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतात. यंदा कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. पण राज्याच्या स्थापनेचा हा दिवस साजरा करण्यासाठी आपण घराबाहेर, ऑफिसबाहेर अथवा मोकळ्या अंगणात किंवा मैदानात सोपी, सुटसुटीत आणि आकर्षक रांगोळी काढू शकता. रांगोळीच्या माध्यमातून महाराष्ट्र दिन साजरा करू शकता. सध्या इंटरनेट विश्वात महाराष्ट्र दिनानिमित्त काढायच्या सोप्या सुटसुटीत आणि आकर्षक रांगोळ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील निवडक महाराष्ट्र दिन रांगोळी व्हिडीओ खास टाइम्स नाऊच्या वाचकांसाठी....

महाराष्ट्र दिन रांगोळी

झटपट काढा आकर्षक महाराष्ट्र दिन रांगोळी

सोपी आणि सुटसुटीत महाराष्ट्र दिन रांगोळी

व्हायरल होत असलेली महाराष्ट्र दिन रांगोळी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी