महेंद्र धोनी बनला शेतकरी, करतोय टरबूज आणि पपईची शेती, पाहा VIDEO

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आता शेतकरी बनला आहे. 

mahendra singh dhoni becomes farmer doing watermelon papaya cultivation watch video in marathi tvirl 99
महेंद्र धोनी बनला शेतकरी, करतोय टरबूज आणि पपईची शेती, पाहा VIDEO  |  फोटो सौजन्य: फेसबुक

रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आता शेतकरी बनला आहे.  हे ऐकून तुम्हांला आश्चर्य वाटेल, पण हे शंभर टक्के खरे आहे. हो, याची माहिती स्वतः महेंद्र सिंग धोनी याने आपल्या फेसबूक पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करून दिली आहे. बुधवारी आपल्या फेसबूक खात्यावर धोनीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो जैविक शेतीची सुरूवात करताना दिसत आहे. या व्हिडिओ सोबत धोनीने लिहिले आहे, रांचीमध्ये २० दिवसामध्ये टरबूज आणि पपईची ऑर्गेनिक शेतीची सुरूवात केली आहे. यावेळी मी खूप उत्साहित आहे. 

व्हिडिओमध्ये माही शेतीला सुरूवात करताना विधीवत पूजा करताना दिसत आहे. या दरम्यान त्याने नारळही फोडले आहे. यानंतर धोनी काही व्यक्तींसोबत  पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. 

 

उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, सध्या धोनी रांचीमध्ये वास्तव्यास आहे. तसेच आपल्या मित्रांसोबत फिरत आहे. धोनी जेएससीए स्टेडियममध्ये  सराव करत आहे. यावेळी त्याने घामही गाळला आहे. 

धोनी बुधवारी आपल्या अनेक जुन्या मित्रांसोबत पतरातू खोरे, सिकिदरी खोरे क्षेत्रात नैसर्गिक सौंदर्यचा आनंद घेत होता. या दरम्यान, धोनी स्वतःची कार चालवली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...