चवीने खा ! Maitree, Special Mix; जीभेवर कायमची राहील 7 भाज्यांची चव, जाणून घ्या सात सवंगडी भाज्यांच्या डिशविषयी

Maitree, Special Mix  : आज आम्ही तुम्हाला या डिशची ओळख करून देणार आहोत. या डिशमधील भाज्या जरी तुमच्या खाण्यात रोज येत असतील तरी या डिशमध्ये एकत्र आल्याने तुम्हाला एक न्यारी चव देऊन जातात. या सात सवंगडी झालेल्या भाज्यांची चव तुमच्या जिभेवर कायमची राहुन जाईल यात शंका नाही. 

Maitree, Special Mix
मैत्री स्पेशल मिक्स; सात सवंगडी भाज्यांची चव आहे न्यारी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मैत्री स्पेशल शेवभाजी, साधी शेवभाजी, पनीर अंगारा, पनीर चिल्ली, मैत्री स्पेशल मिक्स ह्या डिशची विशेष मागणी होत असते.
  • काय आहे सात सवंगडी भाज्या

Maitree, Special Mix  : मालेगाव : मैत्री म्हटलं की मग हुल्लडबाजी,पार्टी (Party), अन्  नुसता धिंगाणा आपल्याला आठवत असतो. त्यात जर खवय्येगिरींची मैत्री असली तर किती पदार्थ आणि किती हॉटेल (Hotel), रेस्टॉरंट (Restaurant), मेस, गाडा यावर या मैत्रीचा (friendship) लोढा किती वेळा जात असेल, याचा काही नेम नाही. वेगवेगळ्या पदार्थांची वेगवेगळी चव ज्यांना चाखायची असते, अशा मित्रांसाठी बनलं आहे मैत्री फॅमिली रेस्टॉरंटची (Maitree Family Restrurant) सात संवगडी असलेल्या भाज्यांची मैत्री स्पेशल डिश.

आज आम्ही तुम्हाला या डिशची ओळख करून देणार आहोत. या डिशमधील भाज्या जरी तुमच्या खाण्यात रोज येत असतील तरी या डिशमध्ये एकत्र आल्याने तुम्हाला एक न्यारी चव देऊन जातात. या सात सवंगडी झालेल्या भाज्यांची चव तुमच्या जिभेवर कायमची राहुन जाईल यात शंका नाही. 

कधी बनली मैत्री

मुळात कॉर्नरची जागा म्हटली म्हणजे काही शॉपिंग किंवा इतर शोमरुची सोय केली जाते. परंतु नावाप्रमाणे काही मित्रांनी मिळून या जागेचं महत्त्व ओळखत बनवलं मैत्री फॅमिली रेस्टॉरंट. संदीप अशोक शिंदे(एचडीएफसी बँक), वैभव इद्रकांत खैरे (एचडीएफसी बँक), राहुल भास्कर रकटे हे या मैत्री रेस्टॉरंटचे मालक. या हॉटेलची सफर ही फारच भारीच आहे. अवघ्या काही महिन्यांच्या प्रवासात मैत्रीमधील पदार्थांची चव मालेगावकरांच्या पसंतीस उतरली. नेहमी मालेगाव म्हटलं म्हणजे अनेकांच्या मनात मुस्लीम समुदायची संख्या पाहून येथे  नॉनव्हेजचं चांगलं भेटत असेल, अशी धारणा असते. पण या धारणेला मैत्रीची स्पेशल मैत्री डिश अपवाद ठरते.

या हॉटेलचे मालक म्हणतात, ‘21 जूनला या रेस्टॉरंटची सुरुवात झाली आणि मोजक्या काही दिवसात मालेगावातील खवय्ये आमच्याकडे आले आणि आमचेच होऊन गेले. आमच्या रेस्टॉरंटमध्ये बनलेली शेवभाजी, असो पनीर अंगारा किंवा मैत्रीची स्पेशल सात सवंगडी असलेल्या भाज्यांची डिश ह्या सर्वच येथील खवय्यांच्या आवडीच्या झाल्या आहेत’. ‘आमच्या रेस्टॉरंटमधील पदार्थांविषयी आणि रेस्टॉरंटविषयी कुठेच जाहीरात केली नाही. सर्व ग्राहकांच्या मौखिक केलेल्या स्तृतीमुळे आम्ही लोकांच्या मनात पोहचू शकलो’. ‘’आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच ग्राहकांपैकी 60 टक्के लोक आपल्या घरी येथे बनलेल्या भाज्या नेत असतात’’.  

तसं पाहिले तर व्हेज रेस्टॉरंटमध्ये काय नवीन मिळणार असं आपण म्हणत असतो. घरात मिळणारे पदार्थ जरी तुम्हाला मेनू कार्डमध्ये दिसत असले तरी यांची चव मात्र फारच वेगळी आहे. मैत्रीचे रंग जसे वेगळे असतात, तशीच मैत्री स्पेशल डिशची चव वेगळी आहे. प्रत्येक घासाला नवा आस्वाद या डिशमधून तुम्हाला मिळत असतो. 

काय विशेष आहे या डिशमध्ये

आता तुम्ही सर्वजण म्हणत असाल काय आहे डिशमध्ये? तर यात आहे भाज्यांचा खजिना. हो, खरचं खजिना. एकाच प्लेटमध्ये आणि एकाच वेळी वेगवेगळ्या भाज्यांची चव चाखायची असेल तर मैत्रीमधील मैत्री स्पेशल हा उत्तम पर्याय. या डिशमध्ये सात पेक्षा अधिक भाज्या एकत्र एकाच प्लेटमध्ये सजवल्या जातात. अगदी कढाईत जाण्याच्या आधीपासून या 7 भाज्या एकत्र येतात. पक्के भावंडं असल्याप्रमाणे एकाच पाण्याच्या भांड्यात मनसोक्त डुबकी लावून कढाईत उड्या मारतात.

veg

या डिशविषयी बोलताना येथील कूक म्हणातात की, ‘या डिशचा सगळ्यात महत्त्वाचं घटक असतो तो म्हणजे ग्रेव्ही. मसाले कमी झाले तरी चालतील पण ग्रेव्हीशी कोणतीही तडजोड करता कामा नये’. या डिशमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गुणधर्माच्या आणि वेगवेगळ्या स्वभावाच्या भाज्या एकत्र येत असतात. यात फ्लॉवर,घेवडा, गाजर, मिरची, शिमला मिरची, काकडी, पनीर, पालकासह काजू, मिक्स केले जाते. प्रत्येक भाजी जिभेवर वेगळी-वेगळी चव देत असते. सर्व भाज्यांचा अर्क उतरलेल्या ग्रेव्हीची मात्र मज्जाच निराळी. ही चव तुम्हाला स्वत: येथे येऊन घेतल्याशिवाय कळणार नाही.

कोणत्या डिशची क्रेझ 

काही महिन्यातच खवय्यांच्या हक्काचं आणि आवडीचं ठिकाण बनलेल्या या रेस्टॉरंटमध्ये लोक जास्त मैत्री स्पेशल शेवभाजी, साधी शेवभाजी, पनीर अंगारा, पनीर चिल्ली, मैत्री स्पेशल मिक्स ह्या डिशची विशेष मागणी करत असतात.

मैत्रीच्या चवीविषयी काय म्हणतात खवय्येगिरी

येथील पदार्थांच्या चवीविषयी बोलताना सुद्धा लोकांच्या तोंडात पाणी येत असतं. सर्वच पदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य दरात तसेच स्वादिष्ट मिळत असल्याने येथे येण्यास उत्सुक असल्याचं ग्राहक सांगतात. चहू बाजुंनी उंच वाढलेल्या वृक्षमित्राच्या सान्निध्यात आणि सुमधूर जुने गाणे ऐकत लोक येथील पदार्थ्यांच्या सुगंधात डुबून खाण्यात मंत्रमुग्ध होत असतात. येथे नवीन येणारा ग्राहक पदार्थाविषयीची आपली प्रतिक्रिया आवर्जनपणे काउंटवर देऊन जात असतो.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी