Viral Video: ममता बॅनर्जींचा अनोखा अंदाज; कलाकारांसोबत केला जबरदस्त डान्स

Mamata Banerjee Dance Viral Video । सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. कधी कोणाचा फोटो व्हायरल होतो तर कधी कोणाचा व्हिडीओ धुमाकूळ घालत असतो.

Mamata Banerjee's unique prediction, did Great dance with artists
ममता बॅनर्जींचा अनोखा अंदाज, कलाकारांसोबत केला जबरदस्त डान्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ममता बॅनर्जींचा अनोखा अंदाज.
  • कलाकारांसोबत केला जबरदस्त डान्स.
  • सोशल मीडियावर ममता बॅनर्जी यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Mamata Banerjee Dance Viral Video । मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. कधी कोणाचा फोटो व्हायरल होतो तर कधी कोणाचा व्हिडीओ धुमाकूळ घालत असतो. यामध्ये सामान्य जनतेपासून सेलिब्रिटी यांचा समावेश असतो. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्या आदिवासी कलाकारांसोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत असून नेटकरी ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत आहेत. (Mamata Banerjee's unique prediction, did Great dance with artists). 

अधिक वाचा : गेमच्या व्यसनाने आईच्या खात्यातून उडवले ३६ लाख रूपये 

ममता बॅनर्जींचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सोशल मीडियावर ममता बॅनर्जी यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये नेहमी त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळतो. या व्हिडीओमध्ये देखील त्या एका वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. ममता बॅनर्जी एका सामूहिक विवाह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या, असे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमात स्थानिक आदिवासी कलाकार पारंपरिक नृत्य सादर करत होते. व्हिडीओमध्ये तुम्ही महिला लोककलाकार पारंपारिक वेशभूषेत पाहू शकता. कलाकारांना नाचताना पाहून ममता बॅनर्जीही स्वत:ला रोखू शकल्या नाहीत आणि त्यांना कलाकारांसोबत नृत्य केले. 

मुख्यमंत्र्यांच्या वेगळ्या अंदाजाची सर्वत्र चर्चा

एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ५१ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर सुमारे पाचशे लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. सोशल मीडियावरील युजर्संना हे नृत्य खूप आवडले असून ते ममता बॅनर्जी यांचे कौतुकही करत आहेत. काहीजण म्हणतात की हे एक सुंदर दृश्य आहे. तर कोणी म्हणते की दीदींनी मन जिंकले आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या या अंदाजाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी