मोबाइल दुरुस्त करू नको कारण...

मोबाइल बिघडला आणि त्यामधील डेटा महत्त्वाचा असला तर हमखास तो फोन दुरुस्तीसाठी येतो. पण काही वेळा मोबाइल दुरुस्तीसाठी देणारे ग्राहक तंत्रज्ञाला लाच देण्याचा प्रयत्न करतात.

Man asks repair shop to not fix his broken iPhone, hides bribe inside it
मोबाइल दुरुस्त करू नको कारण... 

थोडं पण कामाचं

  • मोबाइल दुरुस्त करू नको कारण...
  • मोबाइल तंत्रज्ञाला २०० डॉलरची लाच
  • मोबाइलमधील माहिती गोपनीय राखण्यासाठी दिली लाच

नवी दिल्ली: मोबाइल बिघडला आणि त्यामधील डेटा महत्त्वाचा असला तर हमखास तो फोन दुरुस्तीसाठी येतो. पण काही वेळा मोबाइल दुरुस्तीसाठी देणारे ग्राहक तंत्रज्ञाला लाच देण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही परिस्थितीत मोबाइल दुरुस्त करू नये आणि चौकशीला आल्यावर फोन दुरुस्त होणार नाही असेच जाहीरपणे सांगावे यासाठी तंत्रज्ञाला ग्राहकांकडून लाच दिली जाते. जेव्हा मोबाइल धारकाच्या 'घरवाली-बाहरवाली' अशा भानगडी असतात त्याचवेळी हे प्रकार घडतात. Man asks repair shop to not fix his broken iPhone, hides bribe inside it

सध्या सोशल मीडियावर एक छोटेखानी व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात मोबाइल तंत्रज्ञ असलेल्याच्या टेबलवर दुरुस्तीसाठी आलेल्या फोन सोबत २०० डॉलर आणि एक चिठ्ठी दिसत आहे. चिठ्ठीत लिहिलंय की, पैसे घे आणि मोबाइल दुरुस्त होणार नाही असे सांग. फोन दुरुस्त झाला तर पत्नी माझा जीव घेण्याचा धोका आहे असंही चिठ्ठीत नमूद आहे. सध्या हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओ बघून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

काहींनी पैसे घ्यावे आणि फोन दुरुस्त करू नये असे मत व्यक्त केले आहे तर काही जणांनी पैसे घेतले तरी फोन दुरुस्त कर आणि तो ग्राहकाच्या पत्नीला दाखवून तिच्याकडून आणखी कमाई कर असा सल्ला दिला आहे. काही जणांनी पैसे घ्यावे की नाही हे तंत्रज्ञावर सोडून दिले आहे पण त्याला फोन दुरुस्त करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जणांनी लाच म्हणून मिळालले पैसेही घेऊ नये आणि फोन दुरुस्त करू नये असा सल्ला दिला. अशा असंख्य वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस व्हिडीओवर पडत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी