साप चावला म्हणून त्याने सापाचाच घेतला चावा आणि मग...

व्हायरल झालं जी
Updated May 06, 2019 | 17:45 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Man bites Snake: एका वयोवृद्ध इसमाला सापाने दंश केला आणि त्यानंतर या वृद्धाने चक्क सापालाच चावा घेतला. आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर घडलयं आणि ते सुद्धा भारतात. पहा कुठं घडला आहे हा प्रकार...

man bites snake in Gujarat
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

वडोदरा: सापाला पाहून भल्या-भल्यांची बोबडी वळते मात्र, गुजरातमधील माहिसागर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. माहिसागर जिल्ह्यामधील एका गावातील शेतात काम करणाऱ्या ७० वर्षीय वयोवृद्ध इसमाला सापाने दंश केला. साप चावल्याने हा ते घाबरुन गेले नाहीत तर त्यानी उलटं सापावर हल्ला केला आणि त्याचा चावा घेतला. या घटनेनंतर त्यांना नातेवाईकांनी विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

टाइम्स ऑफ इंडिया च्या वृत्तानुसार, मृत व्यक्तीचं नाव जी बैरिया असं आहे.  त्यांचं वय ७० वर्षे होतं. शनिवारी आपल्या शेतात जी बैरिया काम करत होते आणि काम करत असतानाच त्यांना साप चावला. यानंतर त्यांनी घाबरुन न जाता सापाला पकडलं आणि रागाच्या भरात त्यालाच चावलं. या प्रकरणी जी बैरिया यांच्या सूनेने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं की, एका नातेवाईकांनी हा घडलेला संपूर्ण प्रकार पाहिला होता.

जी बैरिया यांनी सापाला चावलं आणि त्यानंतर त्या सापाचं विष त्यांच्या अंगात पसरलं. बैरिया यांना उपचारासाठी लुनावाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर सरकारी रुग्णालयातून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, कुठल्याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले नाहीत आणि चार तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत साप सुद्धा मरण पावला. या घटनेचं वृत्त सर्वत्र पसरताच सर्वांना एक धक्का बसला आहे.

कुत्रा भुंकला म्हणून कुत्र्याचा कान चावला

असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी घडला होता. पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यात एक दारुड्या रस्त्याने जात होता आणि त्याच दरम्यान भटक्या कुत्र्याने त्याला पाहून भुंकण्यास सुरुवात केली. कुत्रा आपल्यावर भुंकत असल्याने रागाच्या भरात या इसमाने कुत्र्याला पकडलं आणि त्याच्या कानाला चावा घेतला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
साप चावला म्हणून त्याने सापाचाच घेतला चावा आणि मग... Description: Man bites Snake: एका वयोवृद्ध इसमाला सापाने दंश केला आणि त्यानंतर या वृद्धाने चक्क सापालाच चावा घेतला. आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर घडलयं आणि ते सुद्धा भारतात. पहा कुठं घडला आहे हा प्रकार...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola