गुरुग्राममध्ये पैशांचा पाऊस! धावत्या कारमधून शाहिद कपूर स्टाईलमध्ये उधळले लाखो रुपये, पहा नेमकं काय घडलं?

viral video : गुरुग्राममधील रस्त्यावर एकाने कारच्या डिकीमधून नोटा फेकल्या आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून गुरुग्राम पोलिसांनी कारवाई केली आहे.

कारमधून 500-2000 च्या नोटा उडवणं पडलं महागात, शाहिद कपूर स्टाईलने Youtuber पोहोचला तुरुंगात
Man blows notes from moving car in Gurugram  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • कारमधून 500-2000 च्या नोटा उडवणं पडलं महागात
  • शाहिद कपूर स्टाईलने Youtuber पोहोचला तुरुंगात
  • व्हिडिओ फक्त 15 सेकंदांचा आहे

Haryana viral video : : सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर येत आहेत, जे पाहून खूप आश्चर्य वाटते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि विचार कराल की कोणाकडे इतके पैसे कसे असू शकतात. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्रामचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नोटा फेकताना दिसत आहे. (Man blows notes from moving car in Gurugram)

अधिक वाचा : 7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकते मोठे गिफ्ट; इतकी वाढेल सॅलरी

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गुरुग्राममधील रस्त्यावर एक कार वेगाने धावत आहे. कारमध्ये खूप जोरात गाणी वाजत असल्याचे दिसते. कारच्या मागच्या सीटवर एक व्यक्ती बसलेला दिसत आहे आणि तो नोटा काढून फेकताना दिसत आहे. चालत्या गाडीतून पैसे फेकणाऱ्या तरुणाने तोंड रुमालाने झाकले आहे. पांढऱ्या रंगाच्या कारचा क्रमांक दिल्लीचा असल्याचे समजते.

त्याचवेळी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कारमधील तरुणांनी हे पैसे सार्वजनिक ठिकाणी का फेकले, हे पोलिस प्रकरणात त्यांना जाणून घ्यायचे आहे. हा पैसा बेकायदेशीर आहे का? नोटांचा पाऊस का पडला?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी