Great Love : पत्नीसाठी बांधलेले 'ताजमहाल' सारखे घर, सुंदरता आणि विशेषता पाहून तुम्ही म्हणाला वाह ताज' 

आग्रा येथील प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाप्रमाणेच शिक्षणतज्ज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी आपले घर बनवले आहे. त्यांनी पत्नी मंजुषा चोकसे यांना हे सुंदर 4 बेडरूमचे घर भेट दिले आहे. ब-हाणपूर मधून जाणाऱ्या तापी नदीच्या काठावर ताजमहाल बांधला जाणार होता, असं म्हटलं जातं. परंतु, काही कारणांमुळे ते आग्रा येथे बांधले गेले. याबाबत आनंद चौकसे यांनाही खंत होती.

man builds taj mahal replica for wife in madhya pradesh burhanpur banks of tapi River
Great Love : पत्नीसाठी बांधलेले 'ताजमहाल' सारखे घर 
थोडं पण कामाचं
  • शिक्षणतज्ज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या पत्नीला ताजमहालसारखे घर भेट दिले
  • हे आलिशान घर बांधण्यासाठी तीन वर्षे लागली
  • सौंदर्य आणि विशिष्ट्यांमुळे लोक करत आहे प्रशंसा

ब-हाणपूर : सामान्यतः लोक प्रेमात मोठे दावे आणि आश्वासने देतात. काही लोक जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी चंद्र-ताऱ्यांना तोडून आणण्याच्या बाता मारतात. त्याच वेळी काही लोक प्रेमाचे प्रतीक म्हणून 'ताजमहाल' भेट देतात. पण, एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी असे काही केले, जो चर्चेचा विषय बनला आहे. मध्य प्रदेशातील ब-हाणपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला 'ताजमहाल' सारखे घर भेट म्हणून दिले आहे. घराचे सौंदर्य आणि खासियत पाहून तुम्ही एकच म्हणाल, 'प्रेमाचा वाह ताज'.

आग्रा येथील प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाप्रमाणेच शिक्षणतज्ज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी आपले घर बनवले आहे. त्यांनी पत्नी मंजुषा चोकसे यांना हे सुंदर 4 बेडरूमचे घर भेट दिले आहे. ब-हाणपूर मधून जाणाऱ्या तापी नदीच्या काठावर ताजमहाल बांधला जाणार होता, असं म्हटलं जातं. परंतु, काही कारणांमुळे ते आग्रा येथे बांधले गेले. याबाबत आनंद चौकसे यांनाही खंत होती. याबाबत आनंद चौकसे यांनाही चिंता होती. त्यामुळे ही संधी मिळताच त्यांनी पत्नीला ताजमहलसारखे घर भेटवस्तू देण्याची योजना आखली.


 

ही आहे घराची खासियत

ताजमहालसारखे घर बांधताना अनेक अडचणी आल्या, पण आनंदने हिंमत हारली नाही. तब्बल तीन वर्षांच्या मेहनतीनंतर हे आलिशान घर तयार झाले. हे घर बांधण्यापूर्वी आनंद चौकसे त्यांच्या पत्नीसह ताजमहाल पाहण्यास गेले.तेथे जाऊन त्यांनी ताजमहालचा बारकाईने अभ्यास केला. यानंतर आनंद प्रकाश चौकसे यांनी हे घर बांधण्याची जबाबदारी सल्लागार अभियंता प्रवीण चौकसे यांच्याकडे सोपवली. स्वत: अभियंता प्रवीण चौकसे यांनीही आग्रा येथे जाऊन ताजमहालच्या परिसराची माहिती घेतली. घराचे क्षेत्रफळ 90X90 आहे. मूळ रचना 60X60 आहे. तर घुमट 29 फूट उंच आहे. घर कोरण्यासाठी बंगाल आणि इंदूर येथील कारागिरांना पाचारण करण्यात आले. त्याच बरोबर राजस्थानातील मकराना येथील कारागिरांनी घराची फरशी तयार केली आहे. तर फर्निचर सुरत आणि मुंबईतील कारागीर बनविले आहे. आग्रा येथील कारागिरांचीही मदत घेण्यात आली. हे भव्य घर बांधण्यासाठी तीन वर्षे लागली आणि आता हे घर तयार झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी