Man Carrying Python Video : खांद्यावर अजगर ठेवून खेचत होता माणूस, व्हिडीओ झाला व्हायरल

इंटरनेटवर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सापाने जर फुत्कार मारला की लोक घाबरून पळून जातात. तर अजगराने एखाद्या प्राण्याला वेटोळे घातले की तो गेलाच. आता सोशल मीडियावर एका अजगराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एखादा व्यक्ती आपल्या लाडक्या कुत्र्याला उचलून घेऊन जातो तसाच एक माणून एका मोठ्या अजगराल खांद्यावर उचलून घेऊन जात आहे.

python video viral
अजगर व्हिडीओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंटरनेटवर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
  • आता सोशल मीडियावर एका अजगराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
  • एखादा व्यक्ती आपल्या लाडक्या कुत्र्याला उचलून घेऊन जातो तसाच एक माणून एका मोठ्या अजगराल खांद्यावर उचलून घेऊन जात आहे.

Man Carrying Python Video: जगात साप (snake) किंवा अजगर (python) हे फार भयानक प्राणी म्हटले जातात. सापाला पाहून भल्याभल्यांची भितीन गाळण उडते. तसेच अजगराला पाहून लोकांना घाम फुटतो. एक माणूस अजगर खांद्यावर घेऊन त्याला ओढत असेल तर तुम्हाला काय वाटेल? पण असे झाले आहे. एक माणूस भला मोठा अजगर आपल्या खांद्यावर घेऊन पायर्‍यांवर ओढून नेत आहे. अजगर एवढा जड आहे की त्या माणसाला आपला तोलही सांभाळता येत नाहिये. (man carrying heavy python on arms video viral on social media)

अधिक वाचा : Shocking Video: आईने पोटच्या मुलाला फेकले पाचव्या मजल्यावरून, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

इंटरनेटवर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सापाने जर फुत्कार मारला की लोक घाबरून पळून जातात. तर अजगराने एखाद्या प्राण्याला वेटोळे घातले की तो गेलाच. आता सोशल मीडियावर एका अजगराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एखादा व्यक्ती आपल्या लाडक्या कुत्र्याला उचलून घेऊन जातो तसाच एक माणून एका मोठ्या अजगराल खांद्यावर उचलून घेऊन जात आहे. हा अजगर या माणसावर हल्ला कसा करत नाही असा प्रश्न नेटकर्‍यांना पडला आहे.

अधिक वाचा : Viral Video : भर पुरात निघाली वरात! नवरदेवाचा उत्साह शिगेला, गुडघाभर पाण्यातून निघाले वऱ्हाडी

व्हायरल व्हिडीओ

खांद्यावर अजगर ठेवून हा माणूस पायर्‍या चढत होता, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. world_of_snakes या  इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा अजगर चांगलाच मोठा असून त्याचे वजनही खूप आहे. असे असले तरी हा माणूस हा अजगर सोडत नाही. हा अजगर त्याने पाळला असावा असा अंदाज नेटकर्‍यांनी व्यक्त केला आहे. नाहीतर अशा अजगरजवळ गेल्यानंतर त्याने हल्ला केला असता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आसून या अकाऊंटवरून या व्हिडीओला ३६ हजारहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

अधिक वाचा : Viral Video : छतावरून कोसळला तरुण, भावाने ‘कॅच’ करत वाचवला जीव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी