धक्कादायक, सेक्स करताना व्यक्तीचा मृत्यू, मृत्यचे कारण शॉकिंग

कॉलगर्लशी शारीरिक संबंध असतांना 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यानंतरच्या पोस्टमॉर्टम अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

man dies during sexual intercourse with a sex worker
धक्कादायक, सेक्स करताना व्यक्तीचा मृत्यू, मृत्यचे कारण ... 

थोडं पण कामाचं

  • सुमारे 35 वर्षांचा व्यक्तीचा कॉलगर्लशी सेक्स करताना त्याचा मृत्यू झाला.
  • लगर्लविरोधात कारवाई करण्याची मागणीही होऊ लागली

नवी दिल्ली: कधीकधी अशा काही घटना घडतात, ज्यांचा विश्वास ठेवणे कठीण आहे. अशीच एक बाब समोर आली आहे. जी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सुमारे 35 वर्षांचा व्यक्तीचा कॉलगर्लशी सेक्स करताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कॉलगर्लविरोधात कारवाई करण्याची मागणीही होऊ लागली, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट येताच सर्वांनाच धक्का बसला आणि कॉलगर्ललाही क्लीन चिट मिळाली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण

 द सनच्या एका वृत्तानुसार, ही घटना पूर्व आफ्रिकेतील मलावी देशाच्या फालोम्बे येथे घडली आहे.   चार्ल्स मझवा नावाचा व्यक्ती कॉलर्गलशी सेक्स केल्यानंतर बेशुद्ध पडला आणि काही काळानंतर त्याचा मृत्यू झाला. ज्या महिलेबरोबर चार्ल्सचे संबंध होते ती कॉलगर्ल होती आणि तिला वाटले की चार्ल्स शांत झाला आहे, परंतु जेव्हा चार्ल्सने हालचाल करणे थांबवले, तेव्हा कॉलगर्लला कळले की काहीतरी  गडबड आहे. त्यानंतर तिने आपल्या सहकाऱ्यांना माहिती दिली आणि चार्ल्सला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

शवविच्छेदन अहवाल

यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला, तो धक्कादायक होता. पोस्टमार्टम अहवालानुसार चार्ल्सच्या मृत्यूचे कारण अधिक‘ऑर्गेज्म’ असल्याचे म्हटले जाते. मिगोई हेल्थ सेंटरच्या तज्ज्ञांना तपासणीनंतर असे आढळले की चार्ल्स शारीरिक संबंध असतांना जास्त उत्तेजित झाला होता आणि संभोगामुळे त्याच्या मेंदूच्या नसा फुटल्या ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तसेचच कॉलगर्ल या मृत्यूसाठी जबाबदार नसल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.  तिच्यावरील आरोप निराधार आहेत.

 निरोगी लैंगिक जीवन वास्तविक हृदयातील आरोग्याशी संबंधित असते. एका नवीन अभ्यासानुसार, हृदयविकाराच्या झटक्यानंतर निरोगी लैंगिक जीवन जपणार्‍या लोकांमध्ये जगण्याचा दर जास्त असतो. युरोपीयन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन पत्रकात असे म्हटले आहे की लैंगिक संबंध ठेवण्याच्या भीतीमुळे हृदय आणखी झटका येण्याची घटना उद्भवणार नाही, सेक्स नाही करणे हा शहाणपणाचा निर्णय असू शकत नाही.

अशीच एक घटना नागपुरात घडली

अशीच एक घटना काही आठवड्यांपूर्वी नागपुरात घडली होती. नागपुरात महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवताना गळ्याला दोरी बांधून ठेवल्याने एका 30 वर्षीय व्यक्तीचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता. हा व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून त्या महिलेशी संबंधात होता. ज्याचे लग्न झाले  होते. तसेच त्याला एक मुलगा होता. दोघेही रात्री लॉजवर आले. संभोगाच्या वेळी महिलेने नायलॉनच्या दोरीने त्याचे  हात पाय  खुर्चीला बांधले.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने लैंगिक उत्तेजन वाढवण्यासाठी त्याच्या गळ्यातील आणखी एक दोरी अडकवली आरोप आहे. यानंतर, ती महिला वॉशरूममध्ये गेली, ज्या खुर्चीला ती बांधली होती, ती घसरुन गेली आणि त्याभोवती दोरी घट्ट केली. जेव्हा ती महिला परत आली, तेव्हा तिला तिच्या जोडीदाराला हालचाल करताना पाहिले. महिलेने तातडीने मदतीसाठी हाक दिली. तोपर्यंत माणूस मरण पावला होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी