Viral Video Fire Stunt : स्टंटच्या नादात नको त्या ठिकाणी लागली आग, बघा थरारक व्हायरल व्हिडीओ

man doing stunt with fire then what happened watch viral video : एका स्टंटसाठी तयारी करत असताना विचित्र परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

man doing stunt with fire then what happened watch viral video
स्टंटच्या नादात नको त्या ठिकाणी लागली आग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्टंटच्या नादात नको त्या ठिकाणी लागली आग
  • बघा थरारक व्हायरल व्हिडीओ
  • अनेकांनी शेअर केला व्हिडीओ

man doing stunt with fire then what happened watch viral video : पैसे कमावण्यासाठी साहसी खेळ अर्थात स्टंट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्टंट करण्यासाठी स्टंटमॅन सराव करून तयारी करतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयारी पूर्ण झाल्यानंतरच स्टंटमॅन स्टंट करतात. अनेक स्टंटचे व्हिडीओ हे हळू हळू व्हायरल होतात. अशाच एका स्टंटसाठी तयारी करत असताना विचित्र परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

स्टंटमॅन आगीचा खेळ करत होता. एक जळते लाकूड हवेत फेकून कॅच करत होता. हे जळते लाकूड तो पायजम्यात धरून ठेवत होता. या पद्धतीने सुरुवातीला त्याचा स्टंट व्यवस्थित सुरू होता. पण एका प्रयत्नात जळत्या लाकडामुळे पायजम्याने आतून पेट घेतला. पायजम्याला आतून आग लागली आणि बिकट परिस्थिती निर्माण झाली. 

जगातील सर्वात 'सिनिअर' मांजर, केला विश्वविक्रम

मुलीच्या जन्मानंतर मातेला 24 तासांत लागली 80 लाखांची लॉटरी

आगीची धग जाणवू लागली आणि स्टंटमॅनला अस्वस्थ वाटू लागले. स्टंट दरम्यान गडबड झाल्याचे स्टंटमॅनच्या मदतनिसाच्या लक्षात आले. मदतनीस तातडीने धावत मदतीसाठी आला. पण तोपर्यंत स्टंटमॅनला आगीची धग जास्त प्रमाणात जाणवू लागली. 

आगीची धग वाढू लागली आणि आग हळू हळू आणखी पसरत असल्याचे जाणवू लागले. अखेर अस्वस्थ झालेल्या स्टंटमॅनने पायजमा काढून जवळच असलेल्या एका खोलीच्या दिशेने धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओवर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. हा व्हिडीओ 'vikashkushwaha9011' नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून अपलोड झाला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक बघितला आणि शेअर केला आहे. 

प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांच्या आधारे व्हिडीओ केला जातो. व्हायरल होत असलेला स्टंटचा व्हिडीओ हा पण त्याच हेतूने तयार होत असावा. पण व्हिडीओ तयार करताना अनपेक्षित अशी घटना घडली. पायजम्याला आतून आग लागली आणि स्टंटमॅन संकटात सापडला.

व्हिडीओत दिसत असलेले दृश्य धोकादायक आहे. हा स्टंट स्टंटमॅनच्या जीवावर बेतण्याचा धोका होता. पण स्टंटमॅनने आयत्यावेळी पायजमा काढून टाकला स्वतःचा जीव वाचविल्याचे व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी