रात्रीच्यावेळी Google Maps लावून कार चालवणं पडलं महागात, पोहोचला थेट कालव्यात​

Car fall in canal: रस्ता माहिती नसल्याने रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती गुगल मॅप्सच्या आधारे गाडी चालवत होता. मात्र, अचानक ही गाडी थेट एका कॅनॉलमध्ये कोसळली. 

Man driving car by using google maps at night but unfortunately fall in canal viral news in marathi
रात्रीच्यावेळी Google Maps लावून कार चालवणं पडलं महागात, पोहोचला थेट कालव्यात 
थोडं पण कामाचं
  • गुगल मॅप्सच्या आधारे चालवत होते कार
  • गुगल मॅप्सने दाखवला रस्ता अन् झाला अपघात
  • ३०० मीटर खोल पाण्यात कोसळली कार

Car accident while driving on Google Maps: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना रस्ता माहिती नसल्याने आपण Google Maps चा वापर करतो. टेक्नोलॉजीच्या या जगतात गुगल मॅप्स रस्ता दाखवत नागरिकांना आपल्या इच्छुक ठिकाणी पोहोचण्यास मदत करतं. मात्र, आता एक वेगळीच बातमी समोर आली आहे. गुगल मॅम्पच्या सहाय्याने गाडी चालवत असलेल्या एका कुटुंबाला एका मोठ्या अपघाताचा सामना करावा लागला. (Man driving car by using google maps at night but unfortunately fall in canal viral news in marathi)

नेमकं काय घडलं? 

आपल्याला कुठे जायचे असेल पण रस्ता माहिती नसेल तर साहजीकच आपण गुगल मॅप्सचा आधार घेतो. हेच गुगुल मॅप आता आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या स्मार्टफोनमध्येही गुगल मॅप देण्यात आलं आहे. मात्र, याच गुगल मॅप्सवर अवलंबून राहणे एका कुटुंबाला अंगाशी आलं. ही घटना आहे केरळमधील. केरळातील एक कुटुंब रात्रीच्या सुमारास एका ठिकाणी जात होते या दरम्यान त्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरुन हे कुटुंब गाडी चालवत होतं.

अधिक वाचा : Optical Illusion: दगडांमधे बसला आहे एक पक्षी, तुम्ही दाखवा शोधून, ९९ टक्के लोक झाले फेल

केरळमधील कोट्टायम येथून चार सदस्यीय कुटुंबीय आपल्या कारने निघाले होते. रस्ता माहिती नसल्याने त्यांनी गुगल मॅप्सची मदत घेतली. त्यानंतर गुगल मॅपवर दाखवण्यात आलेल्या मार्गाने ते गाडी चालवू लागले. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी रस्त्यावरुन जात असताना अचानक कॅनॉलमध्येच कोसळली.

अधिक वाचा : Snake in Commode : कमोडवर बसणार इतक्यात बाहेर आला साप, फुटला घाम, पाहा VIDEO

३०० मीटर पाण्यात कार 

अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. हे कुटुंबीय कोट्टयम येथून कुंभनाडच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. कार रस्त्यावरु थेट कॅनॉलमध्ये पडली. गाडी कॅनॉलमध्ये पडल्याने कारमधील चौघांसह गाडीही पाण्यात बुडू लागली. काही कळेपर्यंत ३०० मीटर खोल पाण्यात कार गेली.

सुदैवाने तेथे उपस्थित नागरिकांनी हे पाहिलं आणि त्यांनी सर्व प्रवाशांना कारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या कुटुंबीयांचे नातेवाईक आले आणि त्यांनी सर्व प्रवाशांना आपल्या घरी नेलं. कोट्टायम पोलिसांनी सांगितले की, हे कुटुंब तिरुवथुक्कल-नट्टाकोम सिमेंट जंक्शन बायपासवरुन जात असताना हा अपघात झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी