पाच वर्षांपूर्वी खाल्लेलं सँडविच पडलं महागात, आजही सोडतोय गॅस, आता कंपनीवर ठोकला दावा 

Man continuously farting: सँडविच प्रत्येकालाच आवडतो आणि सर्वचजण मोठ्या आवडीने खातात. मात्र, आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने दावा केला आहे की, पाच वर्षांपूर्वी खालेल्या सँडविचचे परिणाम आजही त्याला भोगावे लागत आहेत. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • पाच वर्षांपूर्वी खाल्लं होतं सँडविच
  • मात्र, सँडविच खाल्ल्यानंतर बिघडली तब्येत अन् तेव्हापासून सुरू आहे फार्ट
  • या घटनेमुळे त्याला अनेक गोष्टींचा करावा लागतोय सामना

UK man claims he can not stop fart: अनेकांना घरातील जेवणापेक्षा बाहेरचं किंवा हॉटेलमधील खाद्यपदार्थ खायला खूप आवडतात. तुम्हालाही अशाच प्रकारे बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याची सवय असेल तर ही बातमी जरूर वाचा. एका व्यक्तीने पाच वर्षांपूर्वी एक हॅम रोल खाल्लं होतं. त्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याचं फार्ट (पादणे) सुरू असल्याचा दावा त्याने केला आहे. (man eats sandwich before 5 years and continuously farting till now in birmingham united kingdom)

४६ वर्षीय टायरोन प्रदेस याने ख्रिसमसच्या निमित्ताने बर्मिंघमच्या बाजारातून आपली पत्नी आणि मुलांसाठी जेवण मागवलं होतं. डिसेंबर २०१७ मधील ही घटना आहे. तेथील एका रेस्टॉरंटमधून आपल्या परिवारासाठी त्याने हे खाणं मागवलं होतं. मात्र, हे खाणं खाल्ल्यापासून त्याची प्रकृती बिघडली. अनेक दिवस त्याला बेड रेस्ट सुद्धा कारावं लागलं. इतकेच नाही तर त्याचे परिणाम आजही भोगावे लागत आहेत. कारण, तेव्हापासून त्याचं पादणं थांबतच नाहीये.

अधिक वाचा : August Holidays: ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचा पाऊस; 'या' ठिकाणी फिरण्याचं करू शकता प्लॅनिंग

प्रकरण कोर्टात पोहोचलं

अनेक दिवसांपासून प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने या व्यक्तीने कोर्टात धाव घेत संबंधित रेस्टॉरंटविरोधात खटला दाखल केला आहे. या व्यक्तीच्या वकिलाने सांगितले की, तो अनेक वर्षांपासून लोकांमध्ये खुलेपणाने वावरू शकत नाहीये. आजही त्याला पोटाच्या विचित्र समस्या उद्भवत आहेत. इतकेच नाही तर या सर्व प्रकारामुळे त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबियांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकदा रात्री झोपलेला असतानाही त्याच्या पोटातून विचित्र आवाज येऊ लागतात.

कोट्यवधींची नुकसान भरपाईची मागणी

गेल्या पाच वर्षांपासून या व्यक्तीला पोटाच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याने Frankfurt christmast market ltd कंपनीवर  £२००,००० चा दावा ठोकत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. भारतीय चलनानुसार, ही रक्कम १,९१,२३,२१५ रुपये इतकी होते. या प्रकरणी सध्या न्यायालयात खटला सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी