सेक्सी व्हिडीओ बघितले म्हणून नोकरीच्या परीक्षेत झाला नापास, यू ट्युब विरोधात गेला कोर्टात

Man fails job test after watching sexual content, sues YouTube in Supreme Court for distracting him : आनंद किशोर चौधरी यांनी यू ट्युब या लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

Man fails job test after watching sexual content, sues YouTube in Supreme Court for distracting him
सेक्सी व्हिडीओ बघितले म्हणून नोकरीच्या परीक्षेत झाला नापास  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सेक्सी व्हिडीओ बघितले म्हणून नोकरीच्या परीक्षेत झाला नापास
  • यू ट्युब विरोधात गेला कोर्टात
  • कोर्टाने बाजू ऐकून दिला निर्णय

Man fails job test after watching sexual content, sues YouTube in Supreme Court for distracting him : आनंद किशोर चौधरी यांनी यू ट्युब या लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. यू ट्युबवर अनेक सेक्सी व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ माणसाच्या मनावर परिणाम करतात आणि त्याला विचलीत करतात असे चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि निर्णय दिला. 

यू ट्युब विरोधात कोर्टात जाणारे आनंद किशोर चौधरी राज्य सेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देत होते. या परीक्षेत चौधरी नापास झाले. परीक्षेचा निकाल आल्यानंतर चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

यू ट्युब या लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ आहेत. यात सेक्सी व्हिडीओ पण आहेत. या व्हिडीओंमुळे माणसाच्या मनावर परिणाम होतो. माणूस विचलीत होतो. मी हे सेक्सी व्हिडीओ बघितले आणि विचलीत झालो. याचा परिणाम म्हणून मी राज्य सेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत नापास नोकरीची चांगली संधी गमावली, असे आनंद किशोर चौधरी म्हणाले. स्वतःच्या अपयशासाठी आनंद किशोर चौधरी यांनी थेट यू ट्युब या प्रसिद्ध व्हिडीओ प्लॅटफॉर्मलाच जबाबदार ठरविले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात चौधरी यांची बाजू ऐकून घेऊन निर्णय दिला.

VIDEO: वरमाला घालताच नववधूला ह्रदयविकाराचा झटका, स्टेजवरच कोसळली अन्....

मुलीच्या जन्मानंतर मातेला 24 तासांत लागली 80 लाखांची लॉटरी

सर्वोच्च न्यायलय म्हणाले की, यू ट्युब न बघणे हा पर्याय आपल्याकडे होता. पण तो पर्याय आपण अंमलात आणला नाही. जे व्हिडीओ बघितल्याचे आपण सांगता त्या व्हिडीओत काय आहे याची माहिती यू ट्युबने व्हिडीओ बघण्याआधीच वाचण्याची सोय करून दिली आहे. हे वाचूनही आपण व्हिडीओ बघितला आहे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. यानंतर वेळ वाया घालविणारी याचिका ठरवत सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांची याचिका फेटाळली. हे करताना वेळ वाया घालविल्याप्रकरणी 1 लाख रुपयांचा दंड करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा पवित्रा बघून चौधरी यांनी माफी मागितली आणि दंड कमी करण्याची विनंती केली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांना 25 हजार रुपयांचा दंड केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी