Chip implanted in hand: सारखं सारखं खिशातून ATM Card काढण्याचा कंटाळा, हातातच बसवली चिप

वारंवार खिशातून कार्ड काढावं लागणे आणि ते स्वाईप करावं लागणे, याचा काहीजणांना कंटाळा येतो. या प्रकाराला कंटाळलेल्या अशाच एका अवलियाने एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वारंवार वापरण्याचा कंटाळा आलेल्या या व्यक्तीने आपल्या मनगटातच कार्ड इम्प्लँट करण्याचा निर्णय घेतला

Chip implanted in hand
हातातच बसवली ATM चिप  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • रोज रोज एटीएम बाळगण्याचा आला होता कंटाळा
  • मनगटात बसवली चिप आणि सोडवली समस्या
  • आता कुठेही फक्त हात दाखवून होते पेमेंट

Chip implanted in hand: सध्याच्या काळात घराबाहेर पडल्यानंतर पैसे देण्यासाठी एटीएम कार्डचा (ATM Card) वापर केला जातो. दुकानातून खरेदी केल्यानंतर, रस्त्यावर काही वस्तू विकत घेतल्यावर किंवा हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर कॅश न देता कार्ड स्वाईप (Card swipe) करणं अनेकांसाठी सोयीचं ठरणारं असतं. मात्र आताशा त्याचाही अनेकांना कंटाळा येऊ लागला आहे. वारंवार खिशातून कार्ड काढावं लागणे आणि ते स्वाईप करावं लागणे, याचा काहीजणांना कंटाळा येतो. या प्रकाराला कंटाळलेल्या अशाच एका अवलियाने एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वारंवार वापरण्याचा कंटाळा आलेल्या या व्यक्तीने आपल्या मनगटातच कार्ड इम्प्लँट (Card implant) करण्याचा निर्णय घेतला. वारंवार खिशातून कार्ड काढण्याच्या आणि ठेवण्याच्या व्यापातून सुटका व्हावी, यासाठी त्याने हा उपाय केला. हे इम्प्लँट करण्यासाठी त्याने जवळपास 200 युरो म्हणजेच 19 हजार रुपये खर्च केले. 

आपल्या हातात लावली चिप

पेनलेस प्रोसेसचा वापर करत त्याने आपल्या मनगटात ही चिप बसवली. आता ही व्यक्ती कुठेही फक्त आपला हात दाखवून आर्थिक व्यवहार करू शकते. यासाठी त्याने आपल्या बँकेशी संपर्क साधला युकेतील स्टार्ट-अप वॉलमार्ट या कंपनीच्या माध्यमातून त्याने ही प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेत वेदना होत नाहीत आणि प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 15 मिनिटं लागतात. एका पेट्रोल पंपावर या चिपच्या साहाय्याने आपण कसे पैसे भरले, हे दाखवणारा एक व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे. आपण ही सर्जरी कशी केली, हेदेखील एका व्हिडिओतून त्याने सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

अधिक वाचा - IAS Dance Video: महिला IAS चा डान्स व्हायरल, पाहा कोण आहे ही अधिकारी

आता सहज होते पेमेंट

आता जेव्हा जेव्हा ही व्यक्ती बाजारात काही खरेदीसाठी जाते, तेव्हा सोबत पैसे किंवा पाकिट घेण्याची गरजच पडत नाही. ही व्यक्ती फक्त आपला हात पुढे करते आणि त्याच्या मनगटात बसवलेल्या चिपच्या आधारे त्याचं पेमेंट होतं. आता बाहेर पडताना पैसे विसरण्याचा प्रश्नही त्याच्या आयुष्यातून दूर झाला आहे. तो जिथे जाईल, तिथे त्याच्यासोबत पैसे असतात. त्याच्या मनगटातच त्याने चिप बसवल्यामुळे काहीही खरेदी केल्यानंतर तो फक्त आपला हात समोर करतो आणि पैसे खात्यातून वजा होतात. 

अधिक वाचा - Optical illusion: या ऑप्टिकल इल्युजनमध्ये साप सापडतोय का? 10 सेकंदात शोधण्याचे आव्हान!

अशी केली सर्जरी

ही पेनलेस सर्जरी असते. यात हाताच्या विशिष्ट भागाला लोकल ॲनेस्थेशिया दिला जातो. हा भाग सुन्न झाल्यानंतर तिथल्या त्वचेचा वरचा स्तर कापून त्यात चिप बसवली जाते. त्यानंतर पुन्हा हा भाग जोडला जातो. त्वचेच्या अगदी वरच्या स्तरात ही चिप बसवली गेल्यामुळे तिचं स्कॅनिंग होतं आणि पैसे भरले जातात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी