गर्लफ्रेंडचे तुकडे-तुकडे करून फ्राय केले आणि रस्त्यावर फेकले

अत्यंत किरकोळ कारणावरून भांडण झाल्यावर आपल्या गर्लफ्रेंडचा गळा दाबून हत्या केली. आपला गुन्हा लपविण्यासाठी मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून त्याला फ्राय केले आणि रस्त्यावर फेकले. 

man killed girlfriend then cut body into pieces fry them and throw on road crime news in marathi tcri 23
गर्लफ्रेंडचे तुकडे-तुकडे करून फ्राय केले आणि रस्त्यावर फेकले  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • एका तरूणाने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले 
  • गर्लफ्रेंड प्रेग्नेंट असल्यामुळे वाद झाला त्यानंतर झाले मोठे भांडण 
  • सुरूवातीला तिचा गळा दाबून हत्या केली आणि गुन्हा लपविण्यासाठी केले तुकडे 
  • त्यानंतर तुकडे ओव्हनमध्ये फ्राय करून रस्त्याच्या किनारे फेकले 

अर्जंटिना :  अर्जंटिनामध्ये १९ वर्षीय तरूणाने आपल्या गर्लफ्रेंडची निघृण हत्या केली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचावर आरोप आहे की ५ वर्षांपूर्वी त्याने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे केले आणि ते ओव्हनमध्ये शिजवले. हे प्रकरण पाच वर्षांनंतर कोर्टासमोर आले आणि त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. त्याचे किरकोळ कारणावरून आरोपीचे आपल्या गर्लफ्रेंडशी भांडण झाले होते. त्यानंतर त्याने हे खतरनाक पाऊल उचलले. 

१९ वर्षीय तरूणाचे नाव नइमा वेरा आहे. अर्जंटिना येथील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार वेरा आपल्या गर्लफ्रेंडसोबत त्याच्या अपार्टेमेंटमध्ये आला होता. वेराने पोलिसांनी सांगितले की, त्याचे गर्लफ्रेंडशी भांडण झाले. ती शिड्यांवरून कोसळली त्यानंतर तिला एका चादरी गुंडाळून तिचा गळा दाबून हत्या केली. 

गुन्हाला लपविण्यासाठी झाला हैवान 

हत्या केल्यानंतर तिचे मृतदेह अनेक तुकडे केले. त्यानंतर त्यांना ओव्हनमध्ये शिजवले. तिच्या मृतदेहाचा कोणाला सुगावा लागू नये यासाठी त्याने हे कृत्य केले. फॉरेन्सिक एक्सपर्टने सांगितले की त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू दम घोटला गेला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी