लॉकडाऊनमध्ये गमावली नोकरी, पण जिंकली ४७ कोटींची लॉटरी 

कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी नोकरी गमावल्या आहेत. तर कोणाचा पगार कपात झाली आहे. अशाच प्रकारे एका व्यक्तीने नोकरी गमावली पण सुदैवाने त्याला तब्बल ४७ कोटींची लॉटरी लागली आहे. 

lottery
फोटो सौजन्य: iStockImages (प्रातिनिधीक फोटो)  

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊनमध्ये त्याने गमावली नोकरी 
  • मात्र नशिबाने दिली त्याला साथ 
  • सुदैवाने त्याला लागली ४७ कोटी रुपयांची लॉटरी 

वेलिंग्टन: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनमुळे कोणी आपली नोकरी गमावली तर कोणाची पगार कपात झाली. तर कोणाला यंदा बोनस मिळाला नाही. अशाच प्रकारे न्यूझीलंडमधील हॅमिल्टन येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपली नोकरी गमावली. पण त्याला त्याच्या नशिबाने साथ दिली आणि त्याला तब्बल ४७ कोटी रुपयांची लॉटरी लागली.

लोट्टो लॉटरीच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये त्या माणसाने नोकरी गमावली होती. त्याची पत्नी एक आरोग्य सेवा कर्मचारी आहे आणि ती सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारात आपली महत्वाची भूमिका बजावत कर्तव्य पार पाडत आहे. 

यावर प्रतिक्रिया देताना त्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की, "मी कामावरुन घरी परतले तेव्हा माझा पती स्वयंपाकघरातील टेबलवर बसला होता. तेथे एक पाकीट ठेवलं होतं आणि तो थोडा वेगळाच वागत सुद्धा होता. त्याने मला ते पाकीट उघडण्यास सांगितले. त्यामध्ये एका वृत्तपत्राचं कात्रण होतं ज्यावर लिहिलं होतं की हॅमिल्टन येथील एका व्यक्तीने १०.३ मिलियन न्यूझीलंड डॉलर म्हणजेच ४७ कोटी भारतीय रुपयांची लॉटरी जिंकली आहे. ते पाहून वि त्याला विचारले की मला हे का दाखवत आहेस? त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली की हा विजेता दुसरा कोणी नाही तर आपणच आहोत. मला आधी वाटलं की तो माझ्यासोबत मस्करी करत आहे".

लॉटरीचा निकाल घोषित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीला मायलोट्टो कस्मटर सपोर्टकडून एक ईमेल आला होता. यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, "मला एक ईमेल आला होता ज्यामध्ये मी लॉटरी जिंकल्याचं म्हटलं होतं. सुरूवातीला मला वाटलं की हा एक स्पॅम ईमेल असावा. मग मी मायलोट्टोमध्ये लॉग इन केले आणि माझ्या तिकीटाचा क्रमांक तपासला असता मला विजयी झाल्याची खात्री पटली".

या लॉटरीच्या पैशांतून या जोडप्याला आपल्या अनेक गरजा भागवण्यास मदत होणार आहे. ते आपली जुनी कार दुरुस्त करणार आहेत, कर्ज फेडतील आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची मदत होईल. तसेच इतर गरजूंनाही मदत करता येईल असं त्यांचं नियोजन आहे.

लॉटरी जिंकल्यावर त्याच्या पत्नी प्रतिक्रिया दिली की, आम्हाला शक्य तितके सामान्य राहायचं आहे. आम्हाला जसे आहोत तसेच राहायतं आहे बदलायचं नाहीये. आम्ही खूपच नशिबवान आहोत असं वाटत आहे, भविष्यासाठी काम करायचं आहे आणि इतरांना कशी मदत करता येईल याकडेही लक्ष द्यायचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी