फेसबूकवर आक्षेपार्ह फोटो शेअर करून महिलेशी जबरदस्ती सेक्ससाठी दबाव 

महिलेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिला जबरदस्तीने सेक्स करण्यासाठी दबाब टाकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केले आहे. हे प्रकरण यूएईचे आहे. 

man post woman photos on facebook and forced her to sex with him sex crime in marathi tsex 1
फेसबूकवर आक्षेपार्ह फोटो शेअर करून महिलेशी जबरदस्ती सेक्ससाठी दबाव   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, गळ्यातही पडला इच्छा नसताना
  • महिला वेश्या व्यवसाय करत असल्याचे कुटुंबियांना सांगितले
  • महिलेचे फोटो मॉर्फ करून टाकले सोशल मीडियावर, नंतर सेक्ससाठी टाकला दबाव

नवी दिल्ली :  दुबईतील एका व्यक्तीला सोशल मीडियावर एका महिलेला बदनाम करण्याच्या आरोपात कोर्टाची पायरी चढायला लागली आहे. कोर्टच्या सुनावणीनुसार ४० वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीने महिलेला सेक्शुअल फेव्हरची मागणी केली आहे. जेव्हा महिलेने नकार दिला तेव्हा रागाच्या भरात त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. आरोपी व्यवसायाने एक व्यापारी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही एका बिल्डिंगमध्ये राहत होते. पण नंतर महिला या इमारतीतून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. यामुळे आरोपीला राग आला. रागाच्या भरात त्याने महिलेचे फोटो आक्षेपार्ह पद्धतीने एडीट करून फेसबूकवर शेअर केले. त्यासोबत महिलेचा फोन नंबर आणि अश्लिल कॅप्शन दिले. 

त्याच्यावर आरोप आहे की महिलेला त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तिच्या परवानगीशिवाय तिच्या गळ्यात पडला होता. त्यानंतर पैशांच्या बदल्यात सेक्स करण्याची ऑफरही दिली होती. २५ वर्षीय मूळची पाकिस्तानी असलेली महिला पीडित व्हिजावर साऊदी अरबला आली होती. तिने सांगितले की गेल्या वर्षी ४ मे ला ती यूएईमध्ये आली. या ठिकाणी आपल्या एका नातेवाईकाकडे राहत होती. 

तिने सांगितले की, एका फ्लॅटमध्ये ती इतर महिलांसोबत रूम शेअर करत होती. त्यासाठी ती भाडेही देत होती. त्या व्यक्तीने पीडितेच्या कुटुंबियांना सांगितले की ती वेश्या व्यवसाय करते आहे. लग्न झालेल्या पुरूषांसोबत संबंध बनवून पैसे कमवत आहे. 

त्याचे यावरही मन भरले नाही. त्याने अनेक फेक अकाऊंट तयार केले आणि त्यावर पीडितेचे फोटो आक्षेपार्ह पद्धतीने शेअर केले. त्यावर तिचा कॉन्टॅक्ट नंबरही लिहिला. तसेच बळाचा वापर करून जबरदस्तीने सेक्स करण्याचा दबाव टाकला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचा फोनही जप्त केला आहे. त्याला २७ फेब्रुवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी