Viral News: लैंगिक सुख मिळवण्याच्या नादात व्यक्तीने गुप्तांगात घातले डंबल, डॉक्टरांनी कपाळावर मारला हात

ब्राझीलमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका ५४ वर्षीय लैंगिक सुख मिळवण्याच्या नादात गुप्तांगात डंबल घुसवले आहे. डॉक्टरांना जेव्हा याबाबत कळाले तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारला. तब्बल तीन दिवस उपचारानंतर हे डंबल बाहेर काढण्यात यश आले.

dumbel in anus
डंबेल घातले गुप्तांगात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ब्राझीलमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.
  • एका ५४ वर्षीय लैंगिक सुख मिळवण्याच्या नादात गुप्तांगात डंबल घुसवले आहे.
  • तब्बल तीन दिवस उपचारानंतर हे डंबल बाहेर काढण्यात यश आले.

Dumbbell  in Private Part : ब्राझीलमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका ५४ वर्षीय लैंगिक सुख मिळवण्याच्या नादात गुप्तांगात डंबल घुसवले आहे. डॉक्टरांना जेव्हा याबाबत कळाले तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारला. तब्बल तीन दिवस उपचारानंतर हे डंबल बाहेर काढण्यात यश आले. 

अधिक वाचा : Viral: ऐकाव ते नवलच! चक्क लाईव्ह सामन्यात कपडे काढून मैदानात आली महिला

मिळालेल्या माहितीनुसार ब्राझीलच्या एका व्यक्तीने लैंगिक सुख मिळवण्यासाठी गुप्तांगात व्यायाम करण्याचे डंबल वापरले.  लैंगिक सुख मिळवण्याच्या नादात हे डंबल त्याच्या गुप्तांगात घुसले. नंतर या व्यक्तीला पोटात दुखु लागले आणि त्याने रुग्णालयात धाव घेतली. यानंतर या व्यक्तीने पोटात का दुखत आहे हे सांगितलेच नाही. डॉक्टरांनी या व्यक्तीला पूर्ण तपासले परंतु पोटदुखीचे निदान करता आले नाही. नंतर डॉक्टरांनी या रुग्णाचा पोटाचा एक्सरे काढला. जेव्हा डॉक्टरांच्या हातात एक्सरे आला तेव्हा त्यांनी कपाळावर हातच मारला. या व्यक्तीच्या गुप्तांगात एक ६ इंचाचा डंबेल असल्याचे डॉक्टरांना दिसले. तेव्हा या रुग्णाने डॉक्टरांना खरे खरी सांगितले. 

अधिक वाचा : Viral: 'या मुस्तफा' गाण्यावर मुंबई पोलिसांचे धमाकेदार परफॉर्मन्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

नंतर डॉक्टरांनी हा उपकरणांच्या आधारे डंबेल काढण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉक्टरांना यश आले नाही. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हातांनी हा डंबेल काढण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आणि हे डंबेल बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. 

अधिक वाचा : Optical Illusion: ऐकलं का! ६ मुली पण पायांच्या फक्त ५ जोड्या, जाणून घ्या काय आहे सत्य

जर हा डंबेल लवकर काढला नसता तर या व्यक्तीच्या जिवाला धोका पोहोचला असता असे डॉक्टरांनी सांगितले.  लैंगिक सुखासाठी अशा प्रकारे वस्तू गुप्तांगात घालणे नवीन नाही. इंग्लडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सने २०१० ते २०१९ दरम्यान अशा प्रकारे गुप्तांगातून ३ हजार ५०० वस्तू  बाहेर काढल्या आहेत. यासाठी वर्षाला ३ लाख पौंड खर्च झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. 

अधिक वाचा : Viral Video: कुत्र्याने जंगलाच्या राजा राणीवरच केला हल्ला; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी