‘मला मरायचं आहे’ म्हणत, सोशल मीडियावर व्हिडिओ रेकॉर्ड करून तरुणाची आत्महत्या

व्हायरल झालं जी
Updated Jun 09, 2020 | 19:30 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

कर्नाटकातील एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ माजलीय. २४ वर्षीय तरुणानं मला मरायचं आहे म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आत्महत्या केलीय. जाणून घ्या काय घडलंय असं ज्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं.

Dhananjay regularly posted his opinion on TikTok.  |  Photo Credit: iStock Images
धक्कादायक! टिकटॉकवर व्हिडिओ टाकून तरुणाची आत्महत्या 

थोडं पण कामाचं

  • पेस्टिसााईड्स पिऊन २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या.
  • लॉकडाऊनमुळे झाला होता बेरोजगार, आईला धमकाविण्यासाठी करत होता आत्महत्येचा प्रयत्न
  • टिकटॉकवर मला मरायचं आहे म्हणत व्हिडिओ रेकॉर्ड करून प्यायला पेस्टिसाईड्स

बंगळुरू: कर्नाटकात एक धक्कादायक घटना घडलीय. बेजबाबदार पणाच्या वागणुकीमुळे एका २४ वर्षीय तरुणाचा जीव गेलाय. मृत तरुणाचं नाव धनंजय सांगितलं जातंय. त्यानं पेस्टिसाईड्स पिऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.

कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील कोरातगेरे तालुक्यात ही घटना घडली. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. जेव्हा त्याच्या आईनं त्याला कमाई करत नसल्यावरून सुनावलं. तेव्हा धनंजयनं एक पेस्टिसाईड्ची बॉटल विकत आणली आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ रेकॉर्ड करून पेस्टिसाईड प्यायलं. या सोशल मीडिया व्हिडिओमध्ये त्यानं, ‘मला मरायचं आहे आणि मी स्वत:ला मारण्याचा प्रयत्न करतोय’, असा मॅसेज रेकॉर्ड केला.

गौरागनाहल्ली इथला राहणारा असलेल्या पीडित धनंजयला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही धनंजयनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानं आपली बाईक जोरात चालवत झाडावर आढळली होती. पण त्यावेळी तो किरकोळ जखमी झाला होता. त्याचा जीव वाचला होता.

धनंजयच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी त्यावेळी त्याला जीवासोबत खेळणारे असे स्टंट करू नकोस म्हणून समजावलं होतं, असंही पोलिसांनी सांगितलं. पण त्यानं या सर्वांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि आत्महत्या करण्याचे प्रयत्न करत राहिला. तो नेहमीच सोशल मीडियावर आपले हे अनुभव शेअर करत होता.

मृत तरुण धनंजय ऑटोरिक्षा भाड्यानं घेऊन चालवायचा. अगदी चार महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. शेजाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमुळे त्यांची कमाई थांबली आणि तो मानसिकरित्या खचला होता.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत तरुण आपल्या आईला आत्महत्येची धमकी देत घाबरवू इच्छित होता आणि त्याला मृत्यूचा अनुभव घ्यायचा होता.

त्यानं आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे पहिले पेस्टिसाईड प्यायलं पण नंतर आपण मरू या विचारानं तो घाबरला आणि घराकडे धावला. नंतर त्यानं आपल्या मित्रांना आवाज देत हॉस्पिटलला नेण्यास सांगितलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अशाप्रकारच्या बेजबाबदारपणाच्या वागण्यामुळे धनंजयचा मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं.

यापूर्वीही अशाचप्रकारच्या अनेक घटना घडतांना आपण बघितल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ काढायच्या नादात अनेकांचा जीव गेलाय. काही दिवसांपूर्वीच गंगा नदीत आंघोळीला गेलेल्या पाच किशोरवयीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. तर एका १३ वर्षीय मुलीनं आपल्याला सोशल मीडिया स्टार बनता आलं नाही म्हणून आत्महत्या केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी