सापाला घरातून बाहेर काढणं पडलं महगात; साप पळविण्यासाठी पठ्ठ्यानं पेटवलं स्वत:चं घर

एका व्यक्तीने सापांपासून सुटका करण्याच्या नादात स्वतःचे राहते घर पेटवले आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. Man set a blaze his own home

 Man set a blaze his own home
साप पळविण्यासाठी पठ्ठ्यानं पेटवलं स्वत:चं घर   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सापांना हुसकावण्यासाठी या व्यक्तीने अनोखी शक्कल लढवली
  • आगीच त्या व्यक्तीचे घर भस्मसात झाले आहे
  • १० लाख डॉलर्सच्या संपत्तीचा चुराडा

नवी दिल्ली : आपल्या घरात साप (Snake) घुसला तर सामान्यपणे लोक सर्पमित्र किंवा वन विभागा (Forest Department) च्या कर्मचार्‍यांना (Employees) बोलवतात आणि सापापासून सुटका करून घेतात. परंतु एका व्यक्तीने सापांपासून सुटका करण्याच्या नादात स्वतःचे राहते घर पेटवले आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने (Fire brigade) घटनास्थळी धाव घेतली. या आगीच त्या व्यक्तीचे घर भस्मसात झाले आहे. (Man set a blaze his own home while trying to fight snake infestation)

अमेरिकेतील मेरीलँड भागात एका व्यक्तीच्या घरात साप घुसले होते. या सापांना हुसकावण्यासाठी या व्यक्तीने अनोखी शक्कल लढवली. धुर केल्यामुळे हे साप पळून जातील, असा अंदाज घरमालकाने बांधला. यासाठी या व्यक्तीने कोळसा पेटवला परंतु या कोळशामुळे मोठी आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण घराला आग लागली.

आग आटोक्यात येत नाही हे पाहून त्या व्यक्तीने अग्निशमन दलाला पाचारण केले. मोठ्या प्रयत्नाने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. या आगीत १० लाख डॉलर्सच्या संपत्तीचा चुराडा झाला.   

अग्निशमन दलाने या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साप घराच्या कुठल्या कोपर्‍यात लपले आहेत हे घरमालकाला माहित नव्हते, म्हणून त्याने शक्कल लढवली. परंतु त्यामुळे घराचे चांगलेच नुकसान झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी