अद्भूत! भूतदयेची पराकाष्ठा, इसमाला रस्त्यावर मिळाले जखमी झुरळ, तर त्याला नेले प्राण्यांच्या डॉक्टरांकडे

माणसाचे आणि कीटकांचे, खासकरून झुरळांचे असलेले जीवलग सख्य आपण जाणतोच. बिचाऱ्या झुरळांच्या वाट्याला सहसा केरसुणीच येते. पण एका इसमाने मात्र जखमी झुरळाला रुग्णालयात उपचारासाठी नेऊन प्राणीप्रेमाचा कळस गाठला.

Cockroach
भूतदयेची पराकाष्ठा, इसमाला रस्त्यावर मिळाले जखमी झुरळ, तर त्याला नेले प्राण्यांच्या डॉक्टरांकडे 

थोडं पण कामाचं

  • कुणीतरी तुडवलेल्या झुरळाला इसमाने नेले आपातकालीन उपचारासाठी
  • थायलंडच्या क्राथुम बेईनमधून समोर येत आहे चमत्कारिक घटना
  • प्राण्यांच्या डॉक्टरने केले सदर झुरळावर मोफत उपचार

Cockroach News viral ।  जर आपल्याला एखादे झुरळ (Cockroach) दिसले तर आपण काय कराल? ते झुरळ उडत (fly) असेल तर आपण काय कराल? बहुतेक लोक मोठ्याने किंचाळतील (scream) आणि जिवाच्या आकांताने तिथून पळ (run away) काढतील. पण, जर आपल्याला एखादे झुरळ जखमी अवस्थेत (injured state) दिसले तर आपण काय कराल? आपण दुर्लक्ष (neglect) कराल आणि आपल्या वाटेने पुढे जाल. मात्र थायलंडच्या (Thailand) या व्यक्तीने मात्र असे केले नाही. त्याने त्या जखमी झुरळाला उपचारासाठी (treatment) पशुवैद्यांकडे (veterinary doctor) नेले.

पशुवैद्यांकडे आला एक अनोखा रुग्ण

क्राथुम बेईनमधील पशुवैद्य डॉ. थानू लिंपापाट्टानावाईनिच यांच्याकडे गेल्या आठवड्यात एक अनोखा रुग्ण आला. एक इसम एका जखमी झुरळाला घेऊन त्यांच्या दवाखान्यात पोहोचला. कुणीतरी त्या झुरळाला चुकून आपल्या पायाखाली तुडवल्याचे त्या इसमाने पाहिले होते आणि त्या बिचाऱ्या झुरळाला तसेच रस्त्यावर सोडून देणे काही त्याच्याच्याने करवले नाही. त्यामुळे त्याने त्या झुरळाला चक्क उपचार करण्यासाठी साई राक प्राणीरुग्णालयात नेले.

पशुवैद्यांनी केले इसमाच्या कृतीचे कौतुक

सदर प्रकाराबद्दल डॉ. थानू यांनी फेसबुकवर लिहिले आहे, "काल रात्री आलेली आणीबाणीची केस. रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका झुरळाला कोणीतरी तुडवले. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एका परोपकारी इसमाने ते पाहिले. त्याने लगेच त्या झुरळाला पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. आता त्याच्या जगण्याची शक्यता 50/50 आहे." त्यांनी पुढे लिहिले आहे, "हा विनोद नाही. यातून सर्व प्राणीमात्रांबद्दलचे प्रेम आणि भूतदया दिसते. प्रत्येक जीव हा अनमोल आहे. जगात अशा आणखी व्यक्तींची गरज आहे. दयाळूपणा जगाला आधार देतो. मी त्या इसमाला या झुरळाची काळजी घेण्यासाठी त्याला पुन्हा आणण्यास सांगितले आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही."

नेटकऱ्यांनी केली इसमाच्या दयाळूपणाची प्रशंसा

हे सुदैवी झुरळ वाचले की नाही याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण नेटकऱ्यांनी या इसमाच्या दयाळूपणाबद्दल त्याचे कौतुक केले आहे. 2019मध्येही एका गर्भवती झुरळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा प्रकार रशियातला होता आणि त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी या झुरळावर तातडीने शस्त्रक्रियाही केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी