Viral Video : बसल्या बसल्या जात होता जमिनीखाली, थोडक्यात बचावला जीव, पाहा व्हिडिओ

तुम्ही खुर्चीवर मोबाईल बघत बसला असाल आणि अचानक जमीन खचून पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पडला, तर काय कराल? अशीच घटना या व्हिडिओत घडली आहे.

Viral Video
बसल्या बसल्या जात होता जमिनीखाली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अचानक खचली जमीन
  • पडला मोठा खड्डा
  • थोडक्यात बचावला जीव

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) दररोज हजारो व्हिडिओ (Videos) येत असतात आणि व्हायरल (Viral) होत असतात. त्यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही गंभीर करणारे असतात. प्रत्येकजण आपापली क्रिएटिव्हिटी (Creativity) वापरत अधिकाधिक लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. काही व्हिडिओ पाहिल्यावर ते खोटे आहेत, हे लगेच समजतं. मुद्दाम नाटकीय पद्धतीने रेकॉर्ड केलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात येतात. काही व्हिडिओ मात्र सत्य घटनांचे असतात आणि त्यातील भयानकता पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एक व्यक्ती खुर्चीवर बसला असताना अचानक जमिनीत खड्डा पडल्याचं या व्हिडिओत दिसतं. 

अचानक पडला खड्डा

व्हिडिओत काही माणसं वेगवेगळ्या खुर्च्यांवर बसल्याचं दिसतं. एक व्यक्ती लहान मुलांच्या एका खुर्चीवर बसला आहे. आपल्या मोबाईलमध्ये काही गोष्टी पाहण्यात तो रमला आहे. अचानक त्याची खुर्ची हलू लागते. त्याच्या पाठिमागे जमिनीत अचानक खड्डा पडतो आणि खुर्चीसह तो त्या खड्ड्यात कोसळल्याचं या व्हिडिओत दिसतं. भूकंपानंतर ज्याप्रमाणे जमिनीत भेगा पडतात, तशाच पद्धतीने अचानक जमीन फाटते आणि तो त्यात कोसळतो. 

थोडक्यात वाचला जीव

जमिनीत कोसळल्यानंतर काही क्षण तो माणूस व्हिडिओत दिसत नाही. त्यामुळे जमिनीला पडलेल्या खड्ड्यात तो पडला असावा आणि त्याला पुन्हा वरच येता आलं नसावं, असा भास होतो.हा खड्डा किती खोल असेल आणि जमिनीत किती खोलवर हा माणूस पडला असेल, असा विचार आपण करू लागतो. मात्र त्यानंतर काही मिनिटांत पुन्हा तो माणूस आपल्याला दिसतो. खड्ड्यात पडता पडता या माणसानं स्वतःला सावरल्याचं आपण पाहू शकतो. 

अधिक वाचा - Baba Vanga Predictions 2022: बाबा वेंगाच्या दोन भविष्यवाणी ठरल्या खऱ्या; भारतासाठी सांगितलेली 'ही' गोष्ट

व्हिडिओ पाहणाऱ्यांना धक्का

व्हिडिओ जेव्हा सुरू होतो, तेव्हा तो पाहणाऱ्यांना पुढे काय होईल, याचा अजिबातच अंदाज येत नाही. अचानक जमिन खचते आणि जमिनीत मोठा खड्डा झाल्याचं पाहून प्रत्येकाला धक्का बसतो. त्यानंतर माणूस स्वतःला सावरत खड्ड्यातून वर आल्याचं पाहून प्रत्येकजण सुटकेचा निश्वास सोडतो. हा माणूस खड्ड्यात पडला असता तर त्याचा जीव जाण्याची शक्यता होती, हे परिस्थिती पाहून प्रत्येकाच्या लक्षात येतं. दैव बलवत्तर म्हणूनच एवढ्या मोठ्या संकटातून सहिसलामत, कुठलीही जखम न होता माणूस बाहेर पडल्याचं पाहून प्रत्येकाला हायसं वाटतं. 

अधिक वाचा - Optical Illusion: या फोटोत जे तुम्हाला पहिल्यांदा दिसेल त्यावरून कळेल तुमची पर्सनालिटी, जर तुम्हाला पिलर दिसत असेल तर...

व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्याला अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. मात्र या व्हिडिओत अचानक जमीन खचलीच कशी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी