Viral News : एका माणसाने गिळले एक रुपयांचे एवढे कॉईन्स, रुग्णाच्या पोटातून कॉईन्स काढताना डॉक्टरांची दमछाक

सोशल मीडियावर आश्चर्यचकित तसेच बुचकाळ्यात पाडणार्‍या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक बातमी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका व्यक्तीने एक रुपयांची अनेक नाणी गिळली. त्याला पोटात दुखायला लागले तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा डॉक्टरही घाबरूनच गेले. या रुग्णाच्य पोटात खुप सारी नाणी होती.

coins
नाणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका व्यक्तीने एक रुपयांची अनेक नाणी गिळली.
  • त्याला पोटात दुखायला लागले तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा डॉक्टरही घाबरूनच गेले.

Coins in Stomach: सोशल मीडियावर (Social Media) आश्चर्यचकित तसेच बुचकाळ्यात पाडणार्‍या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक बातमी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका व्यक्तीने एक रुपयांची अनेक नाणी गिळली(one rupee coin swallow) . त्याला पोटात दुखायला (stomach pain) लागले तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा डॉक्टरही घाबरूनच गेले. या रुग्णाच्य पोटात खुप सारी नाणी होती. (man swallows one rupees sixty three coins removed by doctor by endoscopy)

Petrol in Bottle: बाटलीतून पेट्रोल मिळणार नाही! पेट्रोल पंपाच्या नियमावर तरुणाने शोधला तोडगा, पंपावरचे कर्मचारी झाले गप्प

मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानच्या एका ३६ वर्षीय व्यक्तीच्या पोटात दुखु लागले. त्याला रुग्णालयात दाखल केले. जेव्हा डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असता, रुग्णाच्या पोटात धातुची गाठ दिसली. एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की या रुग्णाच्या पोटात खुप सारी एक रुपयांची नाणी आहेत. त्यानंतर एन्डोस्कोपीने या रुग्णाच्या पोटातून एका मागोमाग एक रुपयांचीए नाणी बाहेर काढले.

Sex Crime : शारिरीक संबंधावेळी जोडीदाराच्या परवानगीशिवाय कंडोम काढणे हा गंभीर गुन्हा, कोर्टाचे मत

६३ नाणी काढली बाहेर 

एक्सरे काढल्यानंतर रुग्णाच्या पोटात खुप सारी नाणी आढळली. डॉक्टरांनी जेव्हा रुग्णाला विचारले की किती नाणी गिळलीस? तेव्हा रुग्णाने डॉक्टरांना सांगितले की, त्याने १५-१६ नाणी गिळली. परंतु डॉक्टरांच्या टीमने एन्डोस्कोपी केली आणि एका मागून एक नाणी बाहेर काढली तेव्हा एकूण नाही ही ६३ होती. एक एक नाणी काढून डॉक्टरांची चांगलीच दमछाक झाली. एन्डोस्कोपीनंतर ६१ नाणी काढण्यात यश आले. परंतु शरीरात आणखी दोन नाणी अडकली होती. अखेर शस्त्रक्रिया करून ही दोन नाणी काढण्यात यश आले. 

Shocking! म्युझियममध्ये पर्यटकांचे लपून-छपून शारीरिक संबंध, CCTV मधून झाला खुलासा


रुग्णाने सांगितले कारण

एखादे कॉईन पोटात जाणे ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. परंतु एकाच वेळी ६३ नाणी का गिळली असे डॉक्टरांनी विचारले. तेव्हा या रुग्णाने धक्कादायक कारण सांगितले. हा रुग्ण मनोरुग्ण आहे. तो सारखा उदास होतो. जेव्हा जेव्हा तो जास्त उदास होतो तेव्ह कुठलीही वस्तू गिळून टाकतो. त्या दिवशी ही व्यक्ती जास्तच दुःखी होती,म्हणून एका पाठोपाठ त्याने तब्बल ६३ नाणी गिळली होती. 

Balia: लग्नाला सात महिने झाले पाळणा हलला नाही; गुडन्यूजसाठी सुट्टी हवी म्हणून कॉन्स्टेबलने SPला लिहिली विचित्र चिठ्ठी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी