भोपाळ : देशभरातील विविध राज्यांत मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर (flood situation) आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, असे असतानाही नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून चालत रस्ता ओलांडण्याचा किंवा गाडी नेण्याचा प्रयत्न करतात. पण हेच धाडस अनेकदा जीवावर बेततं. तशा अनेक घटना समोर येताना दिसत आहेत. आता मध्यप्रदेशातूनही अशीच एक बातमी समोर आली आहे. (Man swept away in flood)
मध्यप्रदेशातील खगोन जिल्ह्यातील झिरन्या क्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे रूपावेल नदीला पूर आला होता. नदीला पूर आलेला असताना एका ४० वर्षीय व्यक्तीने नदीवरील पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह इतका होता की, हा व्यक्ती त्या पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
#BreakingNow: मध्य प्रदेश के खरगोन में नदी पार करने के दौरान बहा शख्स, घटना से डेढ़ किलोमीटर दूर मिला शव@iamdeepikayadav @SwetaSri27 #Khargone #MadhyaPradesh pic.twitter.com/xzfFVMgOzu — Times Now Navbharat (@TNNavbharat) July 19, 2022
नदी पार करताना हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या व्यक्तीचा मृतदेह साधारणत: दीड किलोमीटर अंतरावर नदीच्या किनाऱ्यावर आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती नदीच्या पलीकडील दुकानात सामान खरेदी करण्यासाठी जात होता. मात्र, त्यावेळी नदीला पूर आला होता आणि पुराचे पाणी पुलावरुन ओसंडून वाहत होते. त्याच पाण्यात हा व्यक्ती वाहून गेला.
हे पण वाचा : ४ महिला आमदारांची फसवणूक, तुम्हाला सुद्धा आलाय का असा कॉल?
खरगोन जिल्हा मुख्यालयापासून ७० किलोमीटर अंतरावर झिरन्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत राजपुरा येथील रूपावेल नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे. नदीला आलेला पूर आणि आसपासच्या परिस्थितीत पुरस्थितीचा एक व्यक्ती व्हिडिओ शूट करत होता. आपल्या मोबाइलमध्ये व्हिडिओ शूट करत असतानाच हा व्यक्ती नदीवरील पूल ओलांडत होता आणि त्या पुराच्या पाण्यात तो व्यक्ती वाहून गेला. साधारणत: दीड किलोमीटर अंतरावर नदी किनारी तो व्यक्ती आढळून आला. स्थानिक मच्छिमारांनी त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.