लस न घेताच घेणार होणार प्रमाणपत्र, लसीकरण केंद्रावर नर्सने पकडली चोरी

man tries to fool healthcare आरोग्य कर्मचारी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहोचला. जेव्हा नर्सने लस टोचण्यासाठी त्याचा दंड धरला तेव्हा नर्सला काही विचित्र गोष्ट जाणवली.

man tries to fool healthcare staff
लस न घेताच घेणार होता प्रमाणपत्र, पण... 
थोडं पण कामाचं
  • लस घ्यायला घाबरणारा आरोग्य कर्मचारी
  • काळेबेरेअसल्याचे नर्सच्या लक्षात आले
  • प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली

जगात अजूनही कोरोना संकट संपलेले नाही. त्यामुळे प्रत्येक देशाने लसीकरणावर भर दिला आहे. असे असले तरी अनेकांना या कोरोन प्रतिबंधक लसीची भीती वाटत असून त्यांनी लस घेतलीच नाही. असाच एक व्यक्ती लस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र घेऊ पाहत होता. परंतु नर्सने या व्यक्तीची चोरी पकडली असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. man tries to fool healthcare workers by using fake arm to avoid getting Covid-19 jab

लस घ्यायला घाबरणारा आरोग्य कर्मचारी

इटलीत एक ५० वर्षीय आरोग्य कर्मचारीच लस घेण्यासाठी घाबरत होता. कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याने प्रशासनाने त्याला कामावरून निलंबीत केले होते. त्यामुळे हा कर्मचारी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहोचला. परंतु काही तरी काळे बेरेअसल्याचे नर्सच्या लक्षात आले आणि त्याची चोरी पकडली गेली.

नकली हातावर लस

हा आरोग्य कर्मचारी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहोचला. जेव्हा नर्सने लस टोचण्यासाठी त्याचा दंड धरला तेव्हा नर्सला काही विचित्र गोष्ट जाणवली. त्याचा हात थंड आणि रबराचा वाटला. जेव्हा नर्सने त्याचा हात पाहिला तेव्हा तो हात नसून हाताव सिलिकॉन लावले होते.  

प्रशासनाकडून गंभीर दखल

इटालियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने नर्सला विनवण्याचा प्रयत्न केला. परंतु नर्सने याबाबत वरिष्ठ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. तसेच ही बाब गंभीर असून याबात कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी