Viral Video : सोशल मीडियावर दोन व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांचे आहेत. दोन्ही घटनांमध्ये प्रत्येकी एक नागरिक मरता मरता वाचला आहे. व्हिडीओ बघून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नशीब थोर म्हणून हे दोघे वाचले असे काही जण म्हणत आहेत तर यमराजांचा 'लंच टाईम' सुरू होता त्यामुळे हे दोघे वाचल्याची प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे.
एका घटनेत एक व्यक्ती एका व्यावसायिक गाळ्यात प्रवेश करताना दिसत आहे. संबंधित गाळ्याचे शटर वर केलेले आहे. गाळ्याच्या जवळच्या रस्त्यावर डागडुजीचे काम केल्याचे दिसत आहे. दुरुस्ती केलेल्या रस्त्यावर पाय ठेवून पुढे येत व्यक्ती व्यावसायिक गाळ्यात प्रवेश करते त्याचवेळी रस्त्याचा डागडुजी केलेला भाग खचतो.
व्हिडीओ बघताना आपण ज्या रस्त्याची डागडुजी झाली असे समजतो प्रत्यक्षात हे वरवरचे तोंडदेखले काम असल्याचे लक्षात येते. रस्त्याचा वरचा भाग खचून खोल खड्ड्यात पडतो. सुदैवाने संबंधित रस्त्यावरून पुढे आलेल्या व्यक्तीने एव्हाना गाळ्यात प्रवेश केलेला असतो. तो दुसऱ्या ठिकाणी पोहोचल्यामुळे सुरक्षित असतो. एक क्षण वेळ घालवला असता तरी रस्त्याच्या खचलेल्या भागासोबत संबंधित व्यक्ती खोल खड्ड्यात पडली असती. या दुर्घटनेत संबंधित व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. पण तसे घडत नाही. व्यक्ती थोडक्यात वाचते, यामुळेच काही जण यमराजांच्या लंच टाईममुळे वाचला असे म्हणत आहे.
दुसऱ्या व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती एका स्टुलावर बसलेली दिसत आहे. अचानक स्टुलाखालचा भाग खचून खोल खड्ड्यात पडताना दिसतो. स्टुलावर बसलेला कसाबसा सावरत थोडा बाजुला सरकतो आणि स्वतःला वाचवतो. एका क्षणाची दिरंगाई संबंधित व्यक्तीसाठी जीवघेणी ठरण्याचा धोका होता.
दोन्ही घटनांमध्ये घटना घडेपर्यंत त्या परिसरात असलेल्या कोणालाही या ठिकाणी जमीन खचून दुर्घटना घडू शकते अशी शंका पण आलेली नाही. याच कारणामुळे दोन्ही घटनांमध्ये वाचेलेल्या व्यक्ती बेसावध होत्या आणि घटना घडताच त्यांना धक्का बसल्याचे दिसते.