Viral New : पुरुषाला आली पाळी, वैद्यकीय चाचणीनंतर समोर आली धक्कादायक माहिती

चीनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३३ वर्षाला तरुणाला पाळी आली होती. जेव्हा तरुणाने यासंबंधित वैद्यकीय चाचणी केली तेव्हा या चाचणीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणाच्या शरीरात स्त्रीप्रमाणे अंडाशय आणि गर्भाशय होते. या व्यक्तीला स्त्री आणि पुरुषाप्रमाणे लिंग होते.

uterus
व्हायरल बातमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चीनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • एका ३३ वर्षाला तरुणाला पाळी आली होती.
  • जेव्हा तरुणाने यासंबंधित वैद्यकीय चाचणी केली तेव्हा या चाचणीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Viral News : बीजींग:  चीनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३३ वर्षाला तरुणाला पाळी आली होती. जेव्हा तरुणाने यासंबंधित वैद्यकीय चाचणी केली. तेव्हा या चाचणीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणाच्या शरीरात स्त्रीप्रमाणे अंडाशय आणि गर्भाशय होते. 

शौचायलाला गेल्यावर रक्तस्त्राव

चेन ली (नाव बदलेले) हा ३३ वर्षीय तरुण चीनच्या सिशुआन प्रांतात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या लघवीतून रक्तस्त्राव होत होता. तसेच पोटातही दुखत होते. त्यामुळे चेनने डॉक्टरांकडे धाव घेतली. सुरूवातीला डॉक्टरांना हे ऍपेंडिक्सची लक्षणे असल्याचे वाटले आणि त्यांनी त्याप्रमाणे उपचार केले. उपचारानंतरही चेनला बरे वाटत नव्हते. चेनने पुन्हा डॉक्टरांकडे धाव घेतली आणि लक्षणे सांगितले. यावेळी डॉक्टरांनी चेनच्या शरीराची तपासणी आणि काही वैद्यकीय चाचण्या केल्या. या तपासण्याचे रिझल्ट्स आले तेव्हा डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. चेनच्या शरीरात महिलांप्रमाणे अंडाशय आणि गर्भाशय होते. चेनच्या जन्मतःच हे अवयव शरीरात होते. चेनच्या लघवीतून जे रक्त निघत होते ते दुसरे तिसरे काही नसून पाळीमुळे हा रक्सस्त्राव आणि पोटात दुखते होते. चेनच्या शरीरात एका सुदृढ स्त्री प्रमाणे हार्मोन होते तर पुरुष हार्मोनचे प्रमाण कमी होते.

तीन तासांची सर्जरी

अखेर चेन लीवर तीन महिन्यांपूर्वी सर्जरी करून अंडाशय आणि गर्भाशय काढण्यात आले. या वेळी चेनने योग्य प्रकारे सहकार्य केले आणि त्यानंतर चेनचा आत्मविश्वासही वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

चेन बाप होऊ शकत नाही

असे असले तरी चेनच्या आयुष्यात एक समस्या कायम राहणार आहे. चेन ली कधीच बाप होऊ शकत नाही. कारण चेनच्या वृषणातून शुक्राणूंची निर्मितीच होत नाही. त्यामुळे तो बाप होऊ शकत नाही असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 


२०२१ मध्ये मार्च महिन्यात अशीच एक घटना समोर आली होती. एक २५ वर्षीय तरुणीला गुडघ्याला दुखापत झाली म्हणून ती रुग्णालयात दाखल झाली होती. तेव्हा तिच्या शरीरात पुरुष क्रोमोझोम असल्याचे निष्पण्ण झाले होते. तिला आयुष्यात पाळी येऊ शकत नाही असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी