Optical Illusion: आज होईल तुमच्या बुद्धीची खरी परीक्षा! तुम्हाला दिसते का पानांमध्ये लपलेली मगर? 

व्हायरल झालं जी
Updated Jun 17, 2022 | 12:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Photo | आजकाल सोशल मीडियावर दररोज नवनवीन रहस्ये पाहायला मिळतात. सोशल मीडिया हे एक असे क्षेत्र आहे जिथे कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. दरम्यान नेहमी ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात.

Many are failing to find the crocodile hidden in the photo of the optical illusion 
फोटोत लपलेली मगर शोधताना अनेकांना फुटतोय घाम, पाहा फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर दररोज नवनवीन रहस्ये पाहायला मिळतात.
  • यावेळी व्हायरल होत असलेल्या फोटोतील पानांमध्ये एक धोकादायक छोटी मगर लपलेली आहे.
  • फोटोत लपलेली मगर शोधताना अनेकांना फुटतोय घाम.

Viral Photo | मुंबई : आजकाल सोशल मीडियावर दररोज नवनवीन रहस्ये पाहायला मिळतात. सोशल मीडिया हे एक असे क्षेत्र आहे जिथे कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. दरम्यान नेहमी ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांची परीक्षा घेणे अथवा डोळ्यांना फसवणे. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा फोटो पाहून भल्याभल्यांना घाम फुटला आहे कारण या फोटोच्या माध्यमातून फोटोत लपलेली एक मगर शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. (Many are failing to find the crocodile hidden in the photo of the optical illusion). 

दरम्यान, हा फोटो पाहून डोळ्यांची तीक्ष्णता तर तेज होते. तसेच लक्ष केंद्रित करण्यातही खूप मदत होते. जर एखाद्याने लक्ष केंद्रित केले नाही आणि चित्रांमध्ये लपलेली रहस्ये शोधली नाहीत तर त्याला नक्कीच यश मिळणार नाही. कारण या फोटोमध्ये हिरव्या झाडीत एक मगर बसलेली आहे. लक्षणीय बाब म्हणजे अनोख्या आव्हानाने भरलेले हे चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा : ही एक गोष्ट खाल्ल्याने वजन झपाट्याने होईल कमी, वाचा सविस्तर

पानांमध्ये लपली आहे मगर 

सोशल मीडियावर दररोज असे नवनवीन फोटो व्हायरल होत असतात. यावेळी व्हायरल होत असलेल्या फोटोतील पानांमध्ये एक धोकादायक छोटी मगर लपलेली आहे आणि ती अगदी पानांसारखीच दिसत आहे. त्यामुळे तिला शोधणे कठीण होत आहे. पण अनेकवेळा डोळ्यांना ताण देऊन पाहिल्यानंतर मगर दिसते.  दरम्यान सर्वप्रथम या चित्रामध्ये तुम्हाला सगळीकडे हिरवळ पाहायला मिळेल. त्याच हिरवळीमध्ये मगर लपलेली आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही मगर २० सेकंदात शोधून दाखवली तर तुमच्या सारखा चॅम्पियन कोणी नाही अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

कुठे लपली आहे मगर 

एवढी हिंट देऊन देखील तुम्हाला मगर दिसली नसेल तर तुम्हाला आणखी डोके चालवावे लागेल. कारण बहुतांश लोकांना मगर शोधण्यात यश आले नाही. लक्षणीय बाब म्हणजे या चित्राच्या डाव्या बाजूला हिरव्या पानांवर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला तिथे मगरीचा डोळा दिसेल. 

इथे पाहा मगर 

Crocodile viral

जर तुम्ही हे चित्र पाहता क्षणी मगर ओळखली असेल तर तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. मात्र जर तुम्हाला मगर शोधण्यात अपयश आले असेल तर नाराज व्हायची गरज नाही कारण आम्ही दिलेला मगरीचा फोटो पाहून तुम्ही कुठे चुकला आहात याचा शोध घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी