Optical Illusion: चालवा अक्कल लढवा शक्कल! झेब्राच्या कळपातला वाघ शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम

व्हायरल झालं जी
Updated Jun 23, 2022 | 11:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Optical Illusion In Marathi | सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक फोटो शेअर केले जातात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांची परीक्षा घेणे अथवा आपल्या डोळ्यांना फसवणे होय.

Many are failing to find the tiger in the zebra herd
झेब्राच्या कळपातला वाघ शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज लावणे देखील खूप कठीण आहे
  • ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांची परीक्षा घेणे अथवा आपल्या डोळ्यांना फसवणे होय.
  • झेब्राच्या कळपातला वाघ शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम.

Optical Illusion In Marathi | मुंबई : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक फोटो शेअर केले जातात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांची परीक्षा घेणे अथवा आपल्या डोळ्यांना फसवणे होय. सध्या सोशल मीडियावर अशाच एका फोटोने धुमाकूळ घातला आहे. या फोटोची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये एक रहस्य लपले आहे जे शोधताना भल्याभल्यांना घाम फुटत आहे. त्याला शोधण्यासाठी लोक खूप मेहनत करतात आणि काही मोजकेच लोकं यशस्वी होतात. डोळ्यांना चकवा देणारी हा फोटो पाहून लोक पूर्णपणे गोंधळून गेली आहेत, पण लक्षणीय बाब म्हणजे एकाग्रता दाखविल्यानंतर फोटोतील रहस्य नक्कीच शोधले जाऊ शकते. (Many are failing to find the tiger in the zebra herd). 

अधिक वाचा : पाण्याच्या मडक्याशी संबंधित हे उपाय केल्याने होईल धनलाभ

झेब्राच्या कळपात लपलाय वाघ 

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला ऑप्टिकल इल्युजनचा फोटो अनेकांना फसवत आहे. कारण या फोटोतील झेब्राच्या कळपात एक वाघ लपला आहे, त्याला शोधणे फारच कठीण आहे. मात्र हा वाघ शोधताना सगळ्यांना खूप आनंद होत आहे. हा फोटो पूर्णपणे झेब्राने भरलेला आहे आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त झेब्राच दिसेल. पण या झेब्रांमध्ये एक वाघही आहे, पण त्याला शोधण्याचे एक मोठे आव्हान आहे. चला तर मग पाहा फोटो आणि ओळखा कुठे आहे वाघ. 

इथे पाहा फोटो

Tiger Viral Photo

हुशश! इथं लपला आहे वाघ

झेब्राने भरलेल्या फोटोतून तुम्हाला अद्याप वाघ सापडला नसेल तर निराश होण्याची गरज नाही कारण बहुतेक लोकांच्या बाबतीत असेच घडले आहे. तुम्ही फक्त लक्ष केंद्रित करा आणि या फोटोतील रहस्य शोधण्याचा प्रयत्न करा. सर्व प्रथम या फोटोत उजवीकडे पाहा काही वेळाने तुम्हाला झुडूपांच्या मागे एक वाघ दिसेल.

हा पाहा लपलेला वाघ 

tiger in the zebra

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी