कुत्रे पाळण्याची हौस अनेकांना असते, पण रतन टाटा यांचे हे देशी प्रेम आपलेही मन जिंकून घेईल

व्हायरल झालं जी
Updated Nov 20, 2020 | 13:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

रतन टाटा यांचे नाव भारतातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत हमखास येते. ते त्यांच्या परोपकारी वृत्तीसाठी ओळखले जातात. तसेच त्यांची कुत्र्यांची आवडही जगजाहीर आहे. त्यांनी भटक्या कुत्र्यांसाठी घरही बांधले आहे.

Ratan Tata with his dog
कुत्रे पाळण्याची हौस अनेकांना असते, पण रतन टाटा यांचे हे देशी प्रेम आपलेही मन जिंकून घेईल 

थोडं पण कामाचं

  • चाहत्याने विचारले, कुत्र्याचे नाव का ठेवले गोवा?
  • कुत्र्यांसाठी रतन टाटा यांनी तयार केले बाँबे हाऊसमध्ये घर
  • रतन टाटांनी केली होती मृत कुत्र्याची आठवण

जगभरात (World) कुत्री पाळण्याची हौस (having pet dogs) अनेक लोकांना असते. पण भारतातील (India) सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक (one of richest people) असणारे रतन टाटा (Ratan Tata) यांचे कुत्र्यांबाबतचे प्रेम (love for dogs) मात्र वेगळेच (exceptional) आहे. खासकरून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत (stray dogs) टाटा समूहाने (Tata Group) केलेले काम (contribution) नेहमीच चर्चेत असते. नुकतेच रतन टाटा यांचे त्यांच्या गोवा (Goa) नावाच्या कुत्र्यासोबतचे फोटो (photos with dogs) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झाले होते. रतन टाटा हे मुलाखतींदरम्यान (interviews), आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर (Instagram handle) आणि इतर कार्यक्रमांदरम्यानही (other programs) आपले कुत्र्यांबाबतचे प्रेम व्यक्त करत (expresses love for dogs) असतात.

चाहत्याने विचारले, कुत्र्याचे नाव का ठेवले गोवा?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ratan Tata (@ratantata)

रतन टाटांच्या या कुत्र्याचे गोवा असे नाव ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका चाहत्याने शेवटी रतन टाटांना याबाबत विचारलेच. त्याने विचारले की त्यांनी आपल्या कुत्र्याचे नाव गोवा का ठेवले आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना रतन टाटांनी एक रंजक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की ते गोव्याला गेलेले असताना त्यांना एक कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावर फिरताना दिसले. ते त्या पिल्लाला आपल्यासोबत बाँबे हाऊस येथे घेऊन आले. तो त्यांना गोव्याला मिळाला असल्याने त्यांनी त्याचे नाव गोवा ठेवले. गोवा हा त्यांचा आवडता कुत्रा असल्याचेही म्हटले जाते.

(सौ.- इन्स्टाग्राम)

कुत्र्यांसाठी रतन टाटा यांनी तयार केले बाँबे हाऊसमध्ये घर

टाटा समूहाच्या मुंबईतील मुख्यालय बाँबे हाऊस इथे ‘केलेन’ म्हणजेच ‘कुत्र्यांचे घर’ आहे. टाटा समूहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे कुत्र्यांबद्दलचे प्रेम जगजाहीर आहेच. त्यामुळे बाँबे हाऊसमध्ये अनेक वर्षांपासून अनेक भटकी कुत्री राहतात. इथे त्यांच्यासाठी स्वतंत्र खोलीही आहे. या केनेलची रचना अशी आहे की त्यातून ही कुत्री हवे तेव्हा आतबाहेर येऊ आणि जाऊ शकतात. इथे त्यांच्यासाठी खेळणी, डॉग बिस्किटे आणि ताज हॉटेलच्या स्वयंपाकघरातून दररोज येणाऱ्या शिजवलेल्या मांसाचीही व्यवस्था आहे.

(सौ.- इन्स्टाग्राम)

रतन टाटांनी केली होती मृत कुत्र्याची आठवण

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ratan Tata (@ratantata)

रतन टाटा यांचे कुत्र्यांबाबतचे प्रेम त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सतत दिसत असते. ते नेहमी कुत्र्यांचे किंवा त्यांच्यासोबतचे आपले फोटो पोस्ट करत असतात. रतन टाटांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यांच्या टीटो नावाच्या मृत कुत्र्याची आठवण त्याच्या चौदाव्या वाढदिवसानिमित्त काढली होती. त्यांनी लोकांनाही कुत्री वाचवण्याचे आवाहन केले आहे. रतन टाटांच्या केनेलमध्ये सध्या आठ कुत्री आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी