Dance in Rain : आवाज वाढव डीजे तुला…! भर पावसात निघाली वरात, ताडपत्री लावून वऱ्हाडींचा धिंगाणा, पाहा वेड लावणारा VIDEO

हौसेला मोल नसतं, असं म्हणतात. लग्न पार पडल्यावर वऱ्हाडी मंडळींना वरात काढण्याची इच्छा होती. मात्र सुरु होता मुसळधार पाऊस. अखेर या पावसाची पर्वा न करता वऱ्हाडी मंडळींनी डीजेला बोलावलंच..

Dance in Rain
भर पावसात निघाली वरात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ऐन पावसात वऱ्हाडी मंडळींचा डान्स
  • पावसात डीजेसोबत निघाली वरात
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Dance in Rain | रस्त्याने चालताना अचानक पाऊस आला आणि सोबत छत्री नसेल, तर लोक मिळेल त्या ठिकाणी छताचा आसरा घेताना दिसतात. एखाद्या दुकानापाशी किंवा एखाद्या घराच्या छताखाली लोक थांबतात आणि पाऊस जाण्याची वाट पाहतात. शहरात अनेकजण पटकन रिक्षा किंवा टॅक्सी पकडून आपल्या इच्छित स्थळाकडचा प्रवास सुरू करतात. काहीजण जाणीवपूर्वक पावसात भिजण्याचा निर्णय घेतात आणि पावसाचा आनंद घेत आपली पायपीट सुरू ठेवतात. मात्र भर पावसात एखाद्या लग्नाची वरात निघाल्याचं आणि पावसात भिजत भिजत डीजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी डान्स केल्याचं दृश्य तुम्ही कधी पाहिलंय? सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत नेमका हाच नजारा पाहायला मिळतो. 

अशी निघाली वरात

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आहे इंदूरचा. सध्या इंदूरमध्ये पाऊस सुरू आहे. ऐन पावसाळ्यात लग्न झाल्यानंतर जमलेल्या वऱ्हाडी मंडळींना वरात काढण्याचे वेध लागले. मात्र शहरात सतत पाऊस सुरू असल्यामुळे काय करावं, असा प्रश्न पडला होता. मात्र काहीही झालं तरी वरात काढायचीच, असा निर्णय वऱ्हाडी मंडळींनी घेतला. या वरातीसाठी डीजेसुद्धा बोलावण्यात आला आणि डिजेच्या साथीनं वऱ्हाडी मंडळी इंदूरच्या रस्त्यावरून वाजतगाजत वरात घेऊन जाऊ लागली. मात्र तेवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला आणि रस्त्यावरील इतर नागरिकांनी आजूबाजूला आसरा घेतला. वरातीतील मंडळींनी मात्र पावसात भिजतच वरात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 

ताडपत्रीखाली वऱ्हाडी

पावसापासून संरक्षण करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी एका भल्यामोठ्या ताडपत्रीची सोय केली होती. सर्वांनी डोक्यावरून ती ताडपत्री ओढून घेतली आणि त्याखालून डान्स डान्स करत वरात पुढे जात होती. आपापल्या घराच्या गच्चीवरून ही वरात पाहणाऱ्यांना वऱ्हाडी दिसतच नव्हते. ते तर ताडपत्रीखालून डान्स करत होेते. वरून केवळ ताडपत्रीच पुढे सरकताना दिसत होती. 

अधिक वाचा - Optical Illusion: या फोटोतली मांजर दाखवा शोधून, भल्या भल्यांना फुटला घाम पण चॅलेंज झाले नाही पूर्ण

अनोखा जुगाड

हा जुगाड पाहून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं. एखाद्या गोष्टीचा उत्साह असेल तर कुठल्याही समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो, हेच या व्हिडिओतून दिसून येत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. ज्याच्याकडे उत्साह आहे, त्याच्याकडे प्रत्येक संकटावर मात करण्याचे उपाय असतात आणि तो ते शोधून काढतोच, हेच या व्हिडिओतून दिसून येत आहे. ताडपत्री डोक्यावर घेऊन भर पावसात डीजेसह वरात काढणाऱ्या वऱ्हाडींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी