विवाहित महिलेने करुन दाखवली कमाल, पाहा कशी बनली IAS अधिकारी 

कठोर मेहनत आणि कुटुंबीयांची साथ याच्या जोरावर दोन वर्षाचा मुलगा असलेल्या एका महिलेने थेट यूपीएससी परीक्षा पास करत विवाहित महिलांसमोर एक मोठं उदाहरण ठेवलं आहे.

married woman done lots of hard work for crack the upsc exam look how ias officer became
विवाहित महिलेने करुन दाखवली कमाल, पाहा कशी बनली IAS अधिकारी   |  फोटो सौजन्य: Facebook

नवी दिल्ली: लग्नानंतर मुलींचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. अनेकदा जबाबदाऱ्यांमुळे बर्‍याच मुली नोकरी देखील सोडून देता. परंतु, जर सासरच्या माणसांकडून आणि नवऱ्याकडून पुरेसा पाठिंबा मिळाल्यास लग्नानंतरही महिला सर्वोच्च यश संपादन करु शकतात. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील पुष्पलता यादव यांची यशोगाथाही अशीच आहे. एका दोन वर्षांच्या मुलाच्या आईने आयएएसची तयारी करून यूपीएससी परीक्षेत ८०वा क्रमांक मिळवला. पण तिचा हा प्रवास फार सोपा नव्हता. जाणून घ्या कसं मिळवलं तिने हे यश 

पुष्पाचा जन्म हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खुसबुरा या छोट्याशा गावात झाला होता. तिने आपलं सुरुवातीचं शिक्षण गावातील शाळेतूनच पूर्ण केलं होतं. त्यानंतर ती पदवीसाठी तिच्या काकांच्या घरी राहत होती. २००६ मध्ये बीएससीनंतर तिने मास्टर्सही पूर्ण केले. यानंतर तिने एमबीए पूर्ण केलं आणि स्वत:चा खर्च भागविण्यासाठी एका खासगी कंपनीत काम करण्यास सुरवात केली. दोन वर्षे नोकरी केल्यानंतर तिने सरकारी नोकरीसाठीही तयारी केली.दोन वर्षांनंतर तिला स्टेट बँक ऑफ हैदराबाद येथे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळाली. पण येथे काम करत असताना तिला जाणवलं की या मर्यादित काम करणं एवढंच तिला अपेक्षित नाही. मला यापेक्षा देखील आणखी पुढे जायचं आहे. 

दरम्यान, २०११ साली तिचं लग्न झालं आणि लग्नानंतर ती मानेसरला राहण्यासाठी गेली. लग्नानंतर सुमारे चार वर्षाने तिने यूपीएससी परीक्षेची तयारी हा विचार पक्का केला. त्यानंतर २०१५ साली तिने स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये राजीनामा दिला आणि स्पर्धा परीक्षेसाठी सज्ज झाली. 

तिने परीक्षा देण्याचा निर्णय तर घेतला होता. पण त्यावेळी तिच्यासमोर आपल्या दोन वर्षाच्या मुलाची देखील जबाबदारी होती. एका मुलाखतीत पुष्पलताने सांगितलं की, 'मी पाच वर्ष पुस्तकांना हातही लावला नव्हता. खरं तर ती वेळ माझ्यासाठी कठीण होती. पण माझ्या पतीने मला खूप प्रोत्साहन दिलं.'  केवळ पतीच नाही तर तिच्या सासरच्यांनीही तिला शक्य तेवढी मदत केली. त्यावेळी कुटुंबातील लोक मुलाची काळजी घेत होते आणि पुष्पलता ही फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करत होती.

खरं तर तिच्या अभ्यासात एक मोठा खंड पडला होता. त्यामुळे सुरुवातीला अभ्यास करणं तिला जड जात होतं. याबाबत  एका व्हिडिओ मुलाखती पुष्पाला म्हणाली की, 'त्या काळात मी गृहिणी होती, माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे मी मानेसरहून दिल्लीला येऊन अभ्यास करू शकत नव्हती. आता आव्हान असे होते की १० ते १२ तासाच्या अभ्यासासोबत मुलाला हाताळणं हे थोडं कठीण होतं.

'मी पहाटे चार वाजता उठून अभ्यास करायची. त्यानंतर सकाळी मुलाला शाळेत पाठवलं की लागलीच अभ्यासाला लागायची. दुपारी तो घरी आल्यानंतर त्याला झोपवले की पुन्हा अभ्यास करायचे. संध्याकाळी त्याचे आजी आणि आजोबा त्याच्याकडे लक्ष द्यायचे. त्यामुळे मला त्रास व्हायचा नाही. त्यानंतर रात्री दोन तास घरातील कामं आटोपली की, पुन्हा रात्री दोन तास वाचन करायची. त्या काळात मी फक्त सहा तास झोप घेत होती.'

'घरातील कामं करणे हे एक रिफ्रेशमेंट असयाचं माझ्यासाठी. या व्यतिरिक्त माझ्या मुलाबरोबर वेळ घालवणं हे माझ्यासाठी एनर्जी बूस्टर होतं. मी तेव्हा 'ओम शांती ओम' चित्रपटातील एक डायलॉग नेहमी आठवायची. 'अगर आप जिसे पाना चाहो, पूरी कायनात उसे श‍िद्दत से मिलाने में लग जाती है'

पहिल्या दोन प्रयत्नात तिला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र, तरीही तिने तायरी सोडली नाही. त्यानंतर तिसऱ्या वर्षी म्हणजेच २०१७ साली यूपीएससी परीक्षा पास झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी