Math Teacher Dance Video: शाळा (School) आणि कॉलेजमधील (College) आठवणी (Memories) या प्रत्येकाच्या आयुष्यभर लक्षात राहतात. शाळेत असताना घडणारे छोटे छोटे प्रसंग, गंमती आणि घटना या आयुष्यभर स्मृतीपटलावरून हटत नाहीत. याच आठवणींचा एक भाग असतो शाळेचे शिक्षक. शाळेत असताना विद्यार्थ्यांनी पाहिलेल्या शिक्षकांच्या काही कृती या आयुष्यभर लक्षात राहतात. मोठेपणी जेव्हा जेव्हा हे विद्यार्थी एकत्र येतात, तेव्हा याच आठवणी काढून वातावरण प्रसन्न होतं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या गमतीजमती या विद्यार्थी जीवनाचा एक मोलाचा ठेवा असतात. सध्या अशाच एका शिक्षकाचा (Teacher) व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. शाळेत एक शिक्षिका डान्स करत असताना अचानक या शिक्षकालाही नृत्याचे स्फुरण चढते आणि हे शिक्षक तालावर ठेका धरतात.
या व्हिडिओत शाळेत संगीताच्या तालावर नृत्य करणाऱ्या एक शिक्षिका दिसतात. या शिक्षिका एका लईत आपले नृत्य सादर करत आहेत. शाळेत होऊ घातलेल्या एखाद्या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू असल्याचे या व्हिडिओतून दिसते. त्याचवेळी व्यासपीठावर आणखी काही शिक्षक थांबल्याचेही दिसते. त्यातील एका शिक्षकाला शिक्षिकेचे नृत्य पाहून अचानक डान्स करण्याची स्फूर्ती येते. इतर कशाचाही विचार न करता हे शिक्षक आपल्या खास शैलीत डान्स करायला सुरुवात करतात. गुरुजींचा वेडावाकडा आणि मनमुराद डान्स पाहून सर्वांनाच हसू फुटते.
अधिक वाचा - Police saved life: चालत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पोलिसाने वाचवलं मृत्यूच्या दाढेतून, पाहा VIDEO
व्हिडिओच्या तपशिलात दिलेल्या माहितीनुसार इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सुरुवातीला नृत्य करत असतात. ते पाहून गणिताच्या गुरुजींना स्फुरण चढते आणि ते देखील आपला हूनर दाखवण्यासाठी सज्ज होतात. इंग्रजीच्या शिक्षकांकडे नृत्याची एक खास शैली असून त्यांना नृत्य करण्याचा अनुभव असल्याचे दिसते. मात्र गणिताच्या शिक्षकांना नृत्य करण्याचा कुठलाही अनुभव नसून तालासुराचा विचार न करता ते आपल्याच मस्तीत नाचत असल्याचे दिसते. गुरुजींचा हा वाकडातिकडा डान्स बघून प्रत्येकाला अगोदर आश्चर्य वाटते आणि नंतर धक्का बसतो. विशेषतः शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करतात. मात्र गुरुजी आपल्या नृत्याच्या धुंदीत इतके मग्न झालेले असतात की ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. अखेर मुख्याध्यापिका आपल्या कपाळावर हात मारून घेत तिथून निघून जातात. गणिताचे सर मात्र मनमुराद नृत्य करण्याचा आनंद लुटतच राहतात.
अधिक वाचा - Tiger attacked woman: कारमध्ये बसताना वाघाची झडप, महिलेला नेलं खेचत, पाहा व्हिडिओ
गेल्या महिन्यात पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला वीस हजारांहून अधिक हिट्स मिळाले आहेत. लोकांना हा व्हिडिओ अत्यंत मजेशीर वाटत असून या शाळेतील विद्यार्थ्यांची हसून हसून कशी पुरेवाट झाली असेल, याची कल्पना काहीजण करत आहेत. तर डान्सर होण्याचं स्वप्न असताना या महोदयांना शिक्षक व्हावं लागलं, अशी कमेंटही काही जणांनी केली आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडतो आहे.