Village of South Africa: जगभरात अशा अनेक घटना आहेत तेथील संस्कृती आणि इतर गोष्टींसह, रहस्य असे असतात जे ऐकल्यावर त्यावर विश्वासच बसत नाही. अशाच एका गावाबाबत माहिती समोर आली आहे. त्या गावात पुरुषांना गेल्या ३० वर्षांपासून प्रवेशच नाहीये. मात्र, असे असले तरी या गावातील महिला या गरोदर होत आहेत. (men are not allowed in this village but still women become pregnant in south Africa)
हे गाव आहे दक्षिण आफ्रिकेतील उमोजा. या गवात केवळ महिलाच वास्तव्य करतात. समबुरू मासाई जातीच्या संबंधित या महिला एकसारखीच भाषा बोलतात. या गावात गेल्या ३० वर्षांपासून कुठल्याच पुरुषाने प्रवेश केलेला नाहीये. गावातील महिलांनी पुरुषांना गावात प्रवेश बंदी केली आहे. या गावात एकूण २५० महिला वास्तव्यास आहेत.
हे गाव घनदाट जंगलात आहे. अनेक वर्षांपूर्वी या गावात ब्रिटिश सैनिक आले होते. त्यांनी बकरी चारणाऱ्या अनेक महिलांवर बलात्कार केला असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच तेव्हापासून या महिलांच्या मनात पुरुषांबाबत राग आहे.
अधिक वाचा : Viral Video : भर पुरात निघाली वरात! नवरदेवाचा उत्साह शिगेला, गुडघाभर पाण्यातून निघाले वऱ्हाडी
त्यानंतर १५ महिलांनी मिळून पुरुषांपासून वेगळे होत आपलं एक नवं गाव तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या महिलांनी आपल्या गावात कुठल्याही पुरुषाला प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. आता सर्वांच्या मनात प्रश्न येतो की, जर गावात पुरुषच नाहीत तर मग तिथल्या महिला गरोदर कशा होत आहेत. तर हे कुठल्या चमत्कारामुळे होत नाही तर त्यामागचं सत्य समोर आलं आहे
अधिक वाचा : Viral Video : छतावरून कोसळला तरुण, भावाने ‘कॅच’ करत वाचवला जीव
या गावात लपून-छपून पुरुष रात्रीच्या सुमारास गावाच्या बाहेर येतात. त्यानंतर गावातील तरुणी या पुरुषांपैकी आपल्यासाठी एखाद्या पुरुषाची निवड करतात. त्यानंतर ते एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवतात. जोपर्यंत गरोदर होत नाहीत तोपर्यंत या महिला त्या पुरुषासोबत संबंध ठेवतात.
ज्यावेळी महिला गरोदर होते त्यावेळी तो पुरुष त्या महिलेसोबतचे आपले सर्व संबंध तोडून टाकतो. त्यानंतर जन्माला आलेल्या बाळाचा सांभाळ ही महिला एकटीच करते. ही महिला एकटीच पैसे कमावते आणि आपल्या मुलाचा सांभाळ करत घर चालवते. इतकेच नाही तर, आपल्या मुलांनाही या महिला सांगत नाहीत की, त्यांचे वडील कोण आहेत. या गावात बालविवाह झालेल्या, कौटुंबिक वाद, बलात्कार पीडित महिला राहतात.