ऑस्ट्रेलिया भारतातून मोठ्या प्रमाणावर आयात करणार 'हे' औषध

कोरोना संकटाच्या या काळात अनेक देशांची परिस्थिती बिकट झाली आहे. ऑस्ट्रेलिया या देशामोर एक गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलिया भारताची मदत घेणार आहे.

Plague of mice in Australia
ऑस्ट्रेलिया भारतातून मोठ्या प्रमाणावर आयात करणार 'हे' औषध 

थोडं पण कामाचं

  • ऑस्ट्रेलिया भारतातून मोठ्या प्रमाणावर आयात करणार 'हे' औषध
  • ऑस्ट्रेलिया या देशामोर एक गंभीर आव्हान उभे ठाकले
  • आव्हानाला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलिया भारताची मदत घेणार

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या या काळात अनेक देशांची परिस्थिती बिकट झाली आहे. ऑस्ट्रेलिया या देशामोर एक गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलिया भारताची मदत घेणार आहे. [PHOTOS] ‘Unprecedented’ plague of mice destroying food grains, home appliances in Australia’s New South Wales

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. उंदरांमुळे न्यू साउथ वेल्समधील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सामान्य नागरिकही उंदरांमुळे त्रस्त आहेत. उंदरांना मारण्यासाठी घातक विषारी औषधांची मागणी वाढली आहे. अल्पावधीत ही मागणी पूर्ण करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यामुळे न्यू साउथ वेल्सच्या सरकारने ऑस्ट्रेलिया सरकारच्या माध्यमातून भारताशी संपर्क साधला आहे. भारतातून उंदीर मारण्याचे औषध मोठ्या प्रमाणावर आयात करुन समस्या सोडवली जाणार आहे. 

ऑस्ट्रेलिया भारतातून तातडीने पाच हजार लिटर ब्रोमैडिओलोन आयात करण्याच्या तयारीत आहे. उंदीर मारण्यासाठी हे जालीम रसायन आयात करण्याचा निर्णय झाला आहे. ऑस्ट्रेलियातील अनेक शेतकऱ्यांनी तर त्यांच्याकडे असलेली किटनकनाशके बिळांवर फवारुन उंदरांना ठार मारण्याचा प्रयत्न चालवला आहे. 

उंदरांची समस्या गंभीर झाली असतानाच ऑस्ट्रेलिया सरकारला काही प्रश्न सतावत आहे. भारतातून आयात केलेल्या औषधाची मोठ्या प्रमाणावर फवारणी केल्यानंतर उंदीर मरतील. पण काही तासांत लाखो उंदरांना मारल्यानंतर त्यांची विल्हेवाट कशी लावायची आणि मेलेल्या उंदरांची विल्हेवाट लावताना कोणता आजार पसरू नये म्हणून खबरदारी कशी घ्यायची असे प्रश्न निर्माण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचे सरकार उच्च पातळीवर या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. पण भारतातून औषध मागवून उंदरांचा बंदोबस्त करायचा यावर ऑस्ट्रेलियाचे सरकार ठाम आहे. 

दरवर्षी ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येच्या न्यू साउथ वेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट होतो. पण यंदा दरवर्षीपेक्षा जास्त उंदीर झाले आहेत. लागोपाठच्या काही वर्षांमध्ये या भागात उत्तम पाऊस झाला. यंदाच्या वर्षी बंपर उत्पन्न झाले. शेतं धान्याने फुलली आणि हे धान्य खाण्यासाठी उंदीर हजर झाले. शेतांमध्येच नाही तर गोदाम, घर असे सगळीकडे उंदीर फिरत आहेत. घराची कौलं किंवा छत पडले आणि अनेक उंदीर कोसळल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. उंदीर एवढे माजले आहेत की दिवस असो वा रात्र बिनबोभाट फिरत आहेत. उंदरांच्या आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. धान्य फस्त करणे, ते खाून संपले की परिसरातील वायर चावून खाणे, घरातील पर्निचर आणि उपकरणे चावणे अशा प्रकारे उंदरांनी नागरिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी