quarantine in metal boxes : चीनमध्ये संस्थात्मक विलगीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींना धातुच्या बंद खोल्यांमध्ये कोंडले

Millions of Chinese are living in metal boxes during quarantine : चीनमध्ये संस्थात्मक विलगीकरणाच्या (Institutional Quarantine) नावाखाली कोट्यवधी नागरिकांना छोट्या धातुच्या खोल्यांमध्ये बंदीस्त केले जात असल्याचे वृत्त आहे.

Millions of Chinese are living in metal boxes during quarantine
चीनमध्ये संस्थात्मक विलगीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींना धातुच्या बंद खोल्यांमध्ये कोंडले 
थोडं पण कामाचं
  • चीनमध्ये संस्थात्मक विलगीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींना धातुच्या बंद खोल्यांमध्ये कोंडले
  • व्हायरल झालेल्या माहितीमुळे चीनमध्ये भीतीचे वातावरण
  • अनेकांना किमान २१ दिवसांसाठी धातुच्या खोल्यांमध्ये क्वारंटाइन केले

Millions of Chinese are living in metal boxes during quarantine : बीजिंग : चीनमध्ये संस्थात्मक विलगीकरणाच्या (Institutional Quarantine) नावाखाली कोट्यवधी नागरिकांना छोट्या धातुच्या खोल्यांमध्ये बंदीस्त केले जात असल्याचे वृत्त आहे. ही माहिती देणारे निवडक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या माहितीमुळे चीनमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे समजते.

शून्य कोविड धोरणांतर्गत चीनमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्या रुग्णांना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना जास्त चौकशी न करतात भराभर छोट्या धातुच्या खोल्यांमध्ये कोंडून ठेवण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. जिनपिंग प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे ऐन कोरोना संकटात चीनमध्ये दीड ते दोन कोटी नागरिकांवर धातुच्या छोट्या खोल्यांमध्ये बंदीस्त आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. अनेकांना किमान २१ दिवसांसाठी धातुच्या खोल्यांमध्ये क्वारंटाइन केले जात आहेत. धातुच्या खोल्यांमध्ये ठेवलेल्या नागरिकांना खाण्यापिण्याच्या वस्तू, अंथरुण-पांघरुण सरकारी यंत्रणा पुरवत आहे. कपडे स्वतःसोबत आणण्यास परवानगी आहे.

धातुच्या खोल्यांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, झोपण्यासाठी पलंग या मलभूत सुविधा सरकारी यंत्रणेने पुरवल्या आहेत. सुविधा असूनही धातुच्या खोलीत जाण्यास नकार दिला अथवा धातुच्या खोलीत असताना एखाद्या नियमाचे उल्लंघन केले तर संबंधित व्यक्तीला तीन ते चार वर्षांसाठी तुरुंगात पाठवले जात आहेत. चीनच्या अमानवी कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये सरकार विरोधी वातावरण निर्माण होत असल्याचे वृत्त आहे. 

कोरोना संकटाबाबत चीन सरकारने स्वतःच्या नागरिकांना तसेच जगाला दिलेल्या माहितीबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. या संशयाच्या वातावरणात चीनच्या अमानवी विलगीकरण धोरणाचे वृत्त आल्यामुळे जिनपिंग प्रशासन कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याच्या आरोपांचा जोर वाढू लागला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी