कोरोनाच्या नावावर मिळवले कोट्यवधी रुपये आणि चक्क घेतली लॅम्बोर्गिनी कार! 

कोरोनाच्या या संकटात लोकं रोजगारासंबंधी प्रश्नाशी झुंजत असताना दुसरीकडे एका व्यक्तीने कोरोनाच्या नावावर घेतलेल्या पैशाने आलिशान लॅम्बोर्गिनी कार विकत घेतली.

Lamborgini
कोरोनाच्या नावावर मिळवले कोट्यवधी रुपये आणि चक्क घेतली लॅम्बोर्गिनी कार!   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • कोरोना संकट काळातही काही जणांची सुरु आहे लबाडी 
  • कोरोनाच्या नावाखाली एका व्यक्तीने कोट्यवधीची मदत मिळवून खरेदी केली लॅम्बोर्गिनी कार 
  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून लॅम्बोर्गिनी कार केली जप्त 

फ्लोरिडा (अमेरिका): संपूर्ण जग सध्या कोरोना (Corona) विषाणूच्या संकटाशी झगडत आहे. या साथीच्या आजारामुळे भारतासह जगातील बर्‍याच देशांमध्ये कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय देखील ठप्प झाले आहेत. या संकटाच्या वेळी लोक काही प्रमाणात आपला खर्च कमी करत आहेत आणि बरेच जण गरजूंना मदत देखील करीत आहेत. परंतु आम्ही आता आपल्याला ज्याबाबत सांगणार आहोत ते प्रकरण जरा  वेगळंच आहे. एका व्यक्तीने प्रथम कोरोनाच्या नावाने सरकारकडून मदत घेतली आणि नंतर याच पैशातून एक आलिशान लॅम्बोर्गिनी (Lamborghini Car) ही कार खरेदी केली.

कोरोनाच्या नावावर मिळवली होती आर्थिक मदत

हे प्रकरण अमेरिकेच्या फ्लोरिडामधील मियामी येथील आहे.  ज्यात एका व्यक्तीला छोट्या व्यवसायासाठी सरकारकडून देण्यात आलेल्या कोरोनाव्हायरस मदत निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. डेव्हिड टी. हाइन्स याने सरकारकडून मदतीच्या नावाखाली ४ लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक म्हणजेच २९ कोटी रुपये घेतले होते. 'पेचेक प्रोटेक्शन प्रोग्राम' (पीपीपी) अंतर्गत लघु उद्योग प्रशासन (एसबीए) कर्ज म्हणून सरकारने त्याला पैसे दिले होते. लघु उद्योगांना मदत करणे हा पीपीपीचा उद्देश आहे. ज्यासाठी अमेरिकन सरकार नव्या उद्योजकांना मदत करते. 

असे खर्च केले पैसे 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी एक वेगळीच माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, हाइन्सच्या आर्थिक रेकॉर्ड जेव्हा तपासला गेला त्यावेळी त्यात अनेक धक्कादायक  खुलासे झाले. हाइन्सने या पैशातून फक्त महागडी कारच खरेदी केली नव्हती तर महागडे दागिने, कपडे, मियामी बीचवर सुट्टी एन्जॉय करणं यावर हे पैसे खर्च केले होते. तसेच डेटिंग वेबसाइटवरही बरेच पैसे त्याने उधळले होते. पोलिस चौकशीत असं दिसून आलं आहे की, हाइन्सने कर्जापोटी मिळालेला पैसा हा मोठ्या प्रमाणात आपला छंद पूर्ण करण्यासाठी खर्च केला आणि त्याचा कोणताही व्यवसायाशी संबंध नव्हता.

कार करण्यात आली जप्त 

खरं तर, हाइन्सने खोटा दावा करुन हे पैसे कर्ज म्हणून मिळवले होते. पण जेव्हा यामागील सत्य समोर आलं तेव्हा पोलिसांनी  डेव्हिड हाइन्सला तात्काळ अटक केली. यावेळी हाइन्सवर चुकीच्या माहिती दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सध्या त्याची कार आणि बँकेतील पैसे जप्त करण्यात आले आहेत. तसंच हाइन्सवर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी