'यहां जलवा है हमारा', IPL विजेतेपदानंतर रोहित शर्माला बनवलं मुन्ना भय्या!

व्हायरल झालं जी
Updated Nov 11, 2020 | 12:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा IPL ट्रॉफी जिंकली. ड्रीम ११ IPL २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबईने विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला.

Mims on social media after Mumbai Indians' fifth IPL title, Virat Kohli was trolled
ड्रीम ११ IPL २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबईने विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला.   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा IPL ट्रॉफी जिंकली.
  • ड्रीम ११ IPL २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबईने विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला.
  • रोहितच्या पाचव्या IPL विजयाचा संदर्भ देत चाहते विराट कोहलीला टोमणे मारताना दिसले.

दुबई : रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा IPL ट्रॉफी जिंकली. ड्रीम ११ IPL २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबईने विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. रोहितच्या पाचव्या IPL विजयाचा संदर्भ देत चाहते विराट कोहलीला टोमणे मारताना दिसले. दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला १५७ रान्सचे आव्हान दिले होते, हे आव्हान मुंबईने ५ गडी राखून पूर्ण केले. फलंदाजी करताना रोहित शर्माने ६८ धावांची धडाकेबाज खेळी केली. मुंबईच्या या विजयानंतर काही चाहत्यांनी रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार करण्यात यावे अशी मागणी केली.

बऱ्याच मिम्समध्ये रोहित शर्माला मिर्झापूर वेबसीरीजमधील मुन्ना भैया या पत्राबरोबर जोडण्यात आले होते. या मिम्समध्ये रोहित शर्मा असे म्हणताना दिसतो की 'आम्ही जेव्हा फायनलमध्ये जातो तेव्हा त्या सामन्याचा निर्णय आधीच लागलेला असतो.' त्याचबरोबर 'यहां जलवा है हमारा' हा मिर्झापूर वेबसीरीजमधला मुन्ना भैयाचा फेमस डायलॉगचा मिम देखील शेअर करण्यात आला आहे. 

एका मिममध्ये विराट कोहली मुंबईच्या पाचव्या विजेतेपदाबाबत प्रतिक्रिया देताना बोलत आहे की, 'हम यहां एक बार घोड़ी नहीं चढ़ पा रहे हैं ये सब हैं कि घोड़ी पर ही घूम रहे हैं'

चाहत्यांतर्फे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कर्णधारपदाची तुलना वेगवेगळ्या प्रकारे केली असल्याचे या मिम्समधून बघायला मिळाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी