धक्कादायक व्हिडिओ, नाल्याच्या पाण्याचा लोंढा रस्त्यावर, महापालिकेची नालेसफाईचे दावे खोटे 

 पावसाळा आणि 'निसर्ग' चक्रीवादळापूर्वी मुंबई महापालिकेने केलेल्या नालेसफाईचे दावे फोल ठरविणारा व्हिडिओ आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे वाभाडे काढले आहे.

MLA ram kadam post ghatkopar ram  nagar locality video on twitter
धक्कादायक व्हिडिओ, नाल्याच्या पाण्याचा लोंढा रस्त्यावर, महापालिकेची नालेसफाईचे दावे खोटे   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आमदार राम कदम यांनी पोस्ट केला व्हिडिओ 
  • घाटकोपरच्या रामनगर भागात नाल्याचे पाणी रस्त्यावर 
  • नाल्याच्या पाण्यात अनेक दुचाकी वाहन वाहून गेली. 

मुंबई :  पावसाळा आणि 'निसर्ग' चक्रीवादळापूर्वी मुंबई महापालिकेने केलेल्या नालेसफाईचे दावे फोल ठरविणारा व्हिडिओ आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे वाभाडे काढले आहे. तसेच हा व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मेन्शन केला आहे. 

मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात धडकणाऱ्या 'निसर्ग' चक्रीवादळापूर्वी मुंबई महापालिकेने मुंबईच्या सखल भागात पाणी साचू नये यासाठी मोठ्या प्रमाणात नालेसफाई केल्याचा दावा करण्यात आला होता. पण हा दावा फोल असून त्यात तथ्य नसल्याचा आरोप भाजपचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी केला आहे. यासाठी त्यांनी घाटकोपर येथील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात नाल्याच्या पाण्याचा लोंढा रस्त्यावर येताना दिसत आहे. 

आमदार राम कदम यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ घाटकोपरच्या रामनगर वस्तीतील असल्याचे सांगण्यात येत आहे. यात राम कदम यांनी हिंदीमध्ये हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, नालेसफाईचा मुंबई महापालिकेचा दावा खोटा ठरला. हे नका म्हणू की आम्ही आरोप करतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहा. असे म्हणत राम कदम यांनी मुंबई महापालिकेला या ट्विटर व्हिडिओमध्ये टॅग केले आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालय तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ऑफिशल ट्विटर हँडललाही टॅग केले आहे. आता या व्हिडिओनंतर मुंबई महापालिकेचे काय स्पष्टीकरण येते हे पाहावे लागणार आहे. तसेच मुख्यमंत्री या व्हिडिओ संदर्भात चौकशीचे आदेश देतात का हे पाहावे लागणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी