पिरॅमिडसमोर मॉडेलने असे काही फोटो काढले की, ज्यामुळे माजली खळबळ 

इजिप्तमध्ये 4700 वर्ष जुन्या पिरॅमिडसमोर मॉडेल केलेल्या मादक फोटोशूटमुळे एकच खळबळ उडाली आहे. इजिप्शियन पोलिसांनी फोटोशूट करणार्‍या छायाचित्रकाराला अटक केली आहे.

model salma elshimy
पिरॅमिडसमोर मॉडेलने असे काही फोटो काढले की...  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिड्ससमोर मॉडेलने मादक फोटोशूट केल्याप्रकरणी फोटोग्राफरला अटक करण्यात आली आहे. 
  • लोकप्रिय फॅशन मॉडेल सलमा अल-शिमीने पिरॅमिडसमोर फोटोशूट केले आहे
  • पुरातत्व महत्त्व असलेल्या क्षेत्रात असे फोटोशूट्स प्रतिबंधित आहे

कैरो (इजिप्त): इजिप्तच्या (Egypt) हजारो वर्ष जुन्या जगप्रसिद्ध पिरामिडसमोर एका मॉडेलने केलेल्या सेक्सी फोटोशूटमुळे तिथे बरीच खळबळ माजली आहे. इजिप्तच्या पोलिसांनी मॉडेलचे फोटो क्लिक करणार्‍या फोटोग्राफरला यावेळी अटक केली. पुरातत्व साइटवर विचित्र ड्रेस परिधान केलेल्या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच इजिप्तमध्ये एकच हंगामा झाला. जरी मॉडलने तिचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तात्काळ डिलीट केले असले तरीही तोपर्यंत उशीर झाला होता. कारण तोवर हे फोटो व्हायरल देखील झाले होते. या फोटोंमधील मॉडेल सलमा अल शिमीने (Salma Elshimy) हिने पाश्चात्य संस्कृतीतील एक ड्रेस परिधान केला होता.

इजिप्शियन पिरॅमिड्ससमोर मॉडेलचे मादक फोटोशूट केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरला अटक केली असल्याचे सुरक्षा सूत्रांचे म्हणणे आहे. ४७०० वर्ष जुन्या पिरॅमिडसमोर मॉडेल सलमा अल-शिमीचे अनेक फोटो काढण्यात आले आहेत. या पिरामिडला ऐतिहासिक महत्त्व आहे.

मॉडेल सलमा अल-शिमीने फारच आखूड ड्रेस परिधान केला आहे. प्राचीन काळातील राजा फेरोच्या काळात परिधान केले जाणारे हे कपडे आहेत.

तसेच कपडे परिधान करुन मॉडेलने पिरॅमिडसमोर फोटोशूट केलं आणि नंतर ते फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. सलमा शिमी ही इंस्टाग्रामवर खूपच प्रसिद्ध आहे.

दरम्यान, हे फोटो व्हायरल होताच अशीही अफवा पसरली की, सरकारने या मॉडेलला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. 

जेव्हा सलमा शिमीने तिच्या इंस्टाग्रामवरून फोटो डिलिट केले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पुरातत्वतज्ज्ञांनी फोटोशूट केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

मॉडेल सलमा सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असून तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी