Viral Video दीर्घ काळाने आई-मुलाची भेट, आईने चपलेने केले स्वागत

Mother-Son Love मुल कितीही मोठे झाले तरी आईसाठी ते लहानच असते. तसेच मुल कसेही वागले तरी आईचे त्याच्याविषयीचे प्रेम तसूभरही कमी होत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये असेच आईचे मुलावरील अतोनात प्रेम दिसत आहे.

Mom Son Viral Video
दीर्घ काळाने आई-मुलाची भेट, आईने चपलेने केले स्वागत 
थोडं पण कामाचं
  • दीर्घ काळाने आई-मुलाची भेट, आईने चपलेने केले स्वागत
  • मुलावरचे आईचे अमूल्य प्रेम
  • आई-मुलाचा व्हिडीओ व्हायरल

Mom Son Viral Video नवी दिल्ली: आई-मुलाच्या प्रेमाच्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या असतील. हा एक असा विषय आहे ज्याच्यावर अनेकदा अनेक ठिकाणी चर्चा होते. मुलावरचे आईचे प्रेम हे अमूल्य आहे. या प्रेमाची तुलना होऊ शकत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत आईचे मुलावरील प्रचंड प्रेम दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Anwar Jibawi (@anwar)

व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हिडीओमध्ये एका विमानतळावरील दृश्य दिसत आहे. यात विमानातून आलेल्या आईला घेण्यासाठी विमानतळावर आलेला मुलगा दिसत आहे. मुलाच्या एका हातात आईच्या स्वागतासाठी घेतलेला पुष्पगुच्छ आहे आणि दुसऱ्या हातात एक छोटेखानी बोर्ड आहे. या बोर्डवर 'आम्हाला तुझी आठवण येते' अशा स्वरुपाचे वाक्य आहे. थोड्या वेळाने व्हिडीओमध्ये मुलाच्या आईचा प्रवेश होतो. ती समोरुन येताना दिसते. नंतर जे काही झाले त्याचा मजेशीर व्हिडीओ बघण्याची मजा न्यारी आहे.

आईने चपलेने केले मुलाचे स्वागत

मुलाला बघितल्यावर आईला एकदम भरून आलं. प्रेमापोटी तिनं पायातली चप्पल काढून त्याला मारले. अन्वर जिबावी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी बघितला आहे. व्हिडीओ व्हायरल होत आहे. अन्वरने व्हिडीओ अपलोड करुन त्याला माय मॉम इज बॅक अशी कॅप्शन दिली आहे. आतापर्यंत ५.८ दशलक्षांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ बघितला गेला आहे. व्हिडीओवर ६२ हजारांपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत. दीर्घ काळाने झालेल्या भेटीत आईने मुलाला चपलेने फटके मारून एक अनोखी आठवण सप्रेम भेट दिल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी