Monkey Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर माकडाचा जीवघेणा हल्ला, लचके तोडत असतानाच बदललं चित्र, पाहा VIDEO

घराबाहेर खेळणाऱ्या एका दोन वर्षांच्या मुलीवर माकडाने अचानक हल्ला केला. ते पाहून आजूबाजूची मुलं पळून गेली आणि ही मुलगी नेमकी माकडाच्या तावडीत सापडली.

Monkey Attack
दोन वर्षांच्या चिमुकलीवर माकडाचा जीवघेणा हल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दोन वर्षांच्या चिमुकलीवर माकडाचा हल्ला
  • हात, पाय आणि पोटाचे तोडले लचके
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Monkey Attack : एका माकडानं (Monkey) दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर (2 year old girl) हल्ला (attack) चढवल्याचा एक व्हिडिओ सध्या (Viral Video) सोशल मीडियात (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या मित्रांसोबत घराबाहेर खेळणाऱ्या या मुलीवर माकडाने अचानक हल्ला केला आणि तिचे लचके तोडायला सुरुवात केली. हे पाहून तिच्यासोबत असणारी इतर मुलं पळून गेली आणि दोन वर्षांची ही मुलगी एकटीच माकडाच्या तावडीत सापडली. माकडाने तिला अगोदर उचलले आणि जमिनीवर आपटले. या प्रकाराने मुलगी घाबरली आणि जोरजोरात ओरडू लागली. 

आईवडिलांनी घेतली धाव

मुलीचा आवाज ऐकून तिचे आईवडिल धावतच बाहेर आल्याचं व्हिडिओत दिसतं. मुलीच्या आईने माकडाच्या दिशेने धाव घेत मुलीला त्याच्या तावडीतून सोडवले आणि कडेवर घेतले. मुलीच्या वडिलांनी माकडाला तिच्यापासून दूर हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांना चुकवून ते माकड पुन्हा मुलीच्या दिशेला झेपावताना दिसले. वडिलांनी पुन्हा एकदा त्याचा प्रतिकार करत त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदाही मुलीच्या वडिलांना चुकवून माकडाने मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर त्या माकडाला हाकलून लावण्यात आणि मुलीला घेऊन घरी जाण्यात तिचे आईवडिल यशस्वी ठरले. 

घरमालकाचे माकड

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे युक्रेनच्या सीमावर्ती भागातून रशियात आश्रयाला आलेलं हे कुटुंब असल्याचं समोर आलं आहे. रशियाच्या हद्दीत असलेल्या एका गावात या कुटुंबाने आसरा घेतला होता. ज्यांनी त्यांना आसरा दिला, त्यांच्याच मालकीचं हे माकड आहे. या मालकाचं मोठं प्राणीसंग्रहालय असून त्यात अनेक प्रकारचे प्राणी त्यांनी पाळले आहेत. लांडगा, हत्ती आणि इतर काही जंगली श्वापदंही त्यांनी पाळली असून त्यांच्याकडे पक्ष्यांचाही मोठा साठा असल्याचं सांगितलं जात आहे. 

अधिक वाचा - Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी शेअर केला मंगळावरून काढलेला पृथ्वीचा फोटो, कॅप्शनने जिंकले वाचणाऱ्यांचे मन...

मुलीवर उपचार सुरू

माकडाने केलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याचं लक्षात आलं. तिच्या हातापायांवर आणि पोटावर अनेक ठिकाणी माकडाने लचके तोडले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन मुलगी अशक्त झाली होती. तिला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार करून तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. आता मुलीची प्रकृती सुधारत असून तिला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुलगी ठणठणीत बरी होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे परिसरात माकडे आणि इतर प्राण्यांविषयी दहशत पसरली आहे. 

अधिक वाचा - Viral Video : तो वाघाला कुरवाळत होता, तेवढ्यात बिबट्याने केला हल्ला! मग घडला चमत्कार

व्हिडिओ होतोय व्हायरल

ही घटना घडलेल्या परिसरात एक सीसीटीव्ही लावण्यात आला होता. या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून सगळेजण मुलगी लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी