Funny Video: माकडासोबत मस्ती करणं पडलं महागात, पहा 'कुंग फू' ची नवी स्टाइल

व्हायरल झालं जी
Updated Mar 28, 2023 | 17:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Monkey Viral Video: माकड किती उग्र असतात हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. पण जर तुम्ही त्यांना त्रास दिला तरच ते आक्रमक होतात. तसे सहजासहजी ते कुणाचेही काहीही नुकसान करत नाहीत. पण काही मुलं माकडांना त्रास देतात, त्यामुळे ते चिडतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात.

Monkey Instagram funny Viral Video
Funny Video: माकडासोबत मस्ती करणं पडलं महागात, पहा 'कुंग फू' ची नवी स्टाइल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पर्यटन स्ठळी तुम्हाला असे माडक त्रास देतात
  • माकड आणि मुलाचा मजेदार व्हिडिओ व्हायरल
  • माकडाचा 'कुंग फू' शॉट व्हिडिओ

Instagram viral video: माकड किती उग्र असतात हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. पण जर तुम्ही त्यांना त्रास दिला तरच ते आक्रमक होतात. तसे सहजासहजी ते कुणाचेही काहीही नुकसान करत नाहीत. पण काही मुलं माकडांना त्रास देतात, त्यामुळे ते चिडतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात. पर्यटन स्ठळी तुम्हाला असे माडक किंवा माकडांना त्रास देणारे मुलं बघायला मिळतील. (Monkey Instagram funny Viral Video)

आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा माकडाला त्रास देताना दिसत आहे. मग काय.. माकडाला आला ना राग आणि माकडाने जे केले ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. क्षणाचाही विलंब न करता माकड त्या मुलाला 'कुंग फू' शॉटप्रमाणे एक लाथ मारतो. हा व्हिडिओ  इतका मजेदार आहे की ते पाहिल्यानंतर तुमचे हसू थांबणार नाही.

 

अधिक वाचा: पुरस्कार सोहळ्यात दिसला नीरज चोप्राचा वेगळा अंदाज, देसी स्टाइलमध्ये डान्स करून सर्वांना केले आश्चर्यचकित 

माकड आणि मुलाचा मजेदार व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे जो इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी खूप पसंत केला आहे. एका युजरने या फनी व्हिडिओवर, "करून घेतला अपमान, आ गया स्वाड" अशी कमेंट केली. या व्हिडिओवरच्या कमेंट वाचून तुम्हालाही हसायला येईल. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत. त्याच वेळी, ते हजारो वेळा करोडो व्ह्यूजसह शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 'ursarcasm' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी