Monkey Viral Video : माकडाने चाकूला लावली धार, नेटकरी म्हणाले आता कुणाची खैर नाही यार

अनेक वेळा माकड माणसांची नक्कल करताना दिसत असतात. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले असती. तसाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक माकड आपल्या हातात मोठा चाकू हातात घेताना दिसत आहे. monkey knife video viral on social media

monkey viral video
माकडाचा व्हिडीओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर सध्या माकडाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
  • माकड चाकूला धार लावत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
  • आता कुणाची तरी खैर नाही असे नेटकर्‍यांनी म्हटले आहे.

Monkey Viral Video : नवी दिल्ली : मराठीत माकड चाळे म्हणून एक संज्ञा प्रसिद्ध आहे. माकडांच्या विचित्र हरकतीमुळे हे संज्ञा रुढ झाली असावी. परंतु सोशल मीडियावर सध्या माकडाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक माकड चाकूला धार लावत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आता कुणाची तरी खैर नाही असे नेटकर्‍यांनी कमेंटमध्ये म्हटले आहे.

monkey knife video viral on social media  

अनेक वेळा माकड माणसांची नक्कल करताना दिसत असतात. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले असती. तसाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक माकड आपल्या हातात मोठा चाकू हातात घेताना दिसत आहे. भांड्यातील पाण्यात हा चाकू माकड भिजवतो आणि एका दगडावर घासतो. चाकू किती धार झाला आहे हे माकड सारखं तपासून पाहतोय.  

आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे. है तय्यार हम असे कॅप्शन टाकून शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केल आहे. या व्हिडीओला आतापर्यंअ ४ हजार व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. तसेच कमेंट सेक्शनमधून आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.  

काही नेटकर्‍यांनी आश्चर्य व्यक्त करत कमेंट केले आहे. एकाने आधी या माकडांचा विषय संपवतो असे म्हटले आहे. तर एकाने आज कुणाची खैर नाही अशी प्रतिक्रिया दिले आहे. तसेच एका युजरने चाकूला धार लावल्यानंतर काय करणार असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी