Snake Video : मुलावर नागाने उगारला फणा, आईने दाखवली चपळाई! पाहा व्हिडिओ

कोब्रा नाग आपल्या मुलाला दंश कऱणार त्यापूर्वीच चपळाई दाखवत आईने त्याला सापासमोरून दूर केलं. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Snake Video
मुलावर नागाने उगारला फणा, आईची चपळाई  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • मुलाला नाग करणार होता दंश
  • आईने चपळाई दाखवत टाळलं संकट
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Snake Video : मुलावर (son) जेव्हा जेव्हा संकट (Trouble) येतं, तेव्हा तेव्हा त्याची आई (Mother) हिमालयासारखी त्याच्या पाठिशी उभी राहते. आपल्या मुलावर आलेल्या संकटाचा स्वतः सामना करते, पण आपल्या मुलाला कुठलीही इजा पोहोचणार नाही, त्याला कुठलाही दगाफटका होणार नाही, याची काळजी आई घेत असते. विशेषतः मूल लहान असताना तर तळहातावरच्या फोडाप्रमाणे त्याला जपलं जातं आणि त्याच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा आईकडून निकराने सामना केला जातो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून सापाच्या (Snake)  हल्ल्यातून एका आईने आपल्या मुलाला कसं वाचवलं, हे त्यातून पाहता येतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

सापापेक्षा आई ठरली वेगवान

खरं तर साप हा अत्यंत चपळ आणि वेगवान प्राणी मानला जातो. माणसाच्या तुलनेत सापाची चपळाई कित्येक पट अधिक असते आणि आपल्या सर्व कृती तो माणसापेक्षा अधिक चपळाईने करत असल्याचं यापूर्वी अनेकदा दिसून आलं आहे. या व्हिडिओत मात्र आईची चपळाई सापापेक्षाही अधिक असल्याचं दिसून आलं. केवळ मुलाच्या काळजीपोटीच अशी चपळाई आई दाखवू शकली, अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. 

मुलाचा सापाजवळ पाय

या व्हिडिओत एक लहान मुलगा आणि त्याची आई घरातून बाहेर पडताना दिसतं. त्यांच्या पायरीपाशी एक साप बसला आहे. तो पायरीच्या अगदी आतल्या भागाला चिकटून बसला असल्यामुळे आईला किंवा तिच्या मुलाला तो दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही पायऱ्या काही उतरल्याशिवाय तो साप त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येऊच शकणार नाही, हे व्हिडिओ पाहून स्पष्ट समजतं. मुलगा आणि त्याची आई नेहमीप्रमाणे पायऱ्या उतरून खाली येऊ लागतात. जेव्हा साप असलेल्या पायरीवर मुलगा उतरतो, तेव्हा सापाचं अचानक त्याच्याकडे लक्ष जातं आणि तो फणा मारण्यासाठी सज्ज होतो. 

अधिक वाचा - Viral: पतीला आनंदी ठेवण्यासाठी पत्नी करते विचित्र काम!

आईने दाखवली चपळाई

मुलाचा पाय जवळ पडल्यामुळे आपल्या जिवाला धोका आहे, असं वाटल्यामुळे साप अलर्ट होतो आणि फणा बाहेर काढतो. हा फणा तो मुलाच्या पायावर मारणार, त्यापूर्वीच मुलाची आई चपळाई दाखवते. ती पटकन एक पायरी खाली उतरते आणि मुलाला उचलून सापापासून दूर करते. अगदी थोडक्यात काही सेकंदांच्या फरकाने मुलाचा जीव वाचतो. 

साप गेला निघून

मुलाला आईने दूर खेचून घेतल्यानंतर साप पुन्हा त्याच्या त्याच्या मार्गाने निघून जातो. आपल्यावर आलेलं संकट टळलं असं कदाचित त्या सापालाही वाटतं आणि तो सरपटत आपल्या पूर्वीच्या मार्गाने निघून जातो. 

अधिक वाचा -  Rakesh Jhunjhunwala Video : व्हीलचेअरवर असतानाही राकेश झुनझुनवालांनी केला होता डान्स, निधनानंतर जुना Video होतोय Viral

व्हिडिओ होतोय व्हायरल

सापाचं नाव काढलं तरी अनेकांना भिती वाटते. सापाच्या वाटेलाही अनेकजण जात नाहीत. साप समोर आल्यावर काय करायचं हेही अनेकांना कळत नाही. मात्र संकटाच्या प्रसंगी एक आई काय करू शकते आणि किती वेगाने हालचाली करू शकते, याचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहून येत असल्याचं युजर्स म्हणत आहेत. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी